ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

कोरोनीलमुळे कोरोना गेला म्हणणाऱ्या बाबा रामदेवांच्या कुटीत ८३ पॉझिटिव्ह; बाबांना सोशल मीडियावर ट्रोल. 🔸अशोक काळकुटे | संपादक ▪️ कृष्णा आंधळे | प्रतिनिधी. देश्यात कोरोनाने हाहाकार माजला असुन, त्यातच उत्तराखंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. कोरोनाने आता पंतजली योगपीठातही धडक दिली आहे. हरिद्वारमधील पतंजली योगपीठातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रामदेव बाबा यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मात्र, बाबा रामदेव यांच्या प्रवक्त्याने हे वृत्त फेटाळले आहे. पतंजली योगपीठाच्या अनेक संस्थांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी दिलेल्या माहितीनुसार १० एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये ८३ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यामध्ये ४६ पतंजली योगपीठ, २८ योग ग्राम आणि ९ आचार्यकुलम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना योगपीठाच्या परिसरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असेही झा यांनी सांगितले आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर बाबा रामदेव यांनी मागील वर्षी कोरोना महामारीत लाँच केलेल्या कोरोनील औषधाला ट्रोल करण्यात येत आहे. एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये ८३ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यामध्ये ४६ पतंजली योगपीठ, २८ योग ग्राम आणि ९ आचार्यकुलम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना योगपीठाच्या परिसरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असेही झा यांनी सांगितले आहे. दरम्यान, उत्तराखंडात आयोजित करण्यात कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो साधू , संत, भाविकांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात निर्बंध लावण्यात आले असून, गुरुवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आताच्या घडीला उत्तराखंडात सुमारे २७ हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनीलमुळे कोरोना गेला म्हणणाऱ्या बाबा रामदेवांच्या कुटीत ८३ पॉझिटिव्ह; बाबांना सोशल मीडियावर ट्रोल.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️ कृष्णा आंधळे | प्रतिनिधी.
देश्यात कोरोनाने हाहाकार माजला असुन, त्यातच उत्तराखंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. कोरोनाने आता पंतजली योगपीठातही धडक दिली आहे. हरिद्वारमधील पतंजली योगपीठातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रामदेव बाबा यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. मात्र, बाबा रामदेव यांच्या प्रवक्त्याने हे वृत्त फेटाळले आहे.

पतंजली योगपीठाच्या अनेक संस्थांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी दिलेल्या माहितीनुसार १० एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये ८३ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यामध्ये ४६ पतंजली योगपीठ, २८ योग ग्राम आणि ९ आचार्यकुलम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना योगपीठाच्या परिसरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असेही झा यांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर बाबा रामदेव यांनी मागील वर्षी कोरोना महामारीत लाँच केलेल्या कोरोनील औषधाला ट्रोल करण्यात येत आहे.

एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये ८३ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यामध्ये ४६ पतंजली योगपीठ, २८ योग ग्राम आणि ९ आचार्यकुलम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या सर्वांना योगपीठाच्या परिसरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असेही झा यांनी सांगितले आहे.

दरम्यान, उत्तराखंडात आयोजित करण्यात कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या शेकडो साधू , संत, भाविकांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात निर्बंध लावण्यात आले असून, गुरुवारी १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आताच्या घडीला उत्तराखंडात सुमारे २७ हजार रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

error: Content is protected !!