ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

मुस्लिम व्यक्तीने रोगराई कमी होण्यासाठी सोडल्या दोन गावरान गाई मोकळ्या.

मुस्लिम व्यक्तीने रोगराई कमी होण्यासाठी सोडल्या दोन गावरान गाई मोकळ्या.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️नंदकुमार मोरे | केज.
देशात गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत कोरोना सारख्या महाभयंकर रोग कमी होण्याच नाव घेत नाही. . देशासह जगातील विज्ञान यावर लस शोधत आहे तर अनेक जण आपापल्या पद्धतीने याला कस रोखता येईल असे प्रयत्न करत आहे. असाच काही सा प्रकार काल केज तालुक्यातील कुंबेफळ येथे पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील मुस्लिम असणाऱ्या सय्यद खिजरोद्दिन यांनी काल स्वतः खर्च करून दोन गाई विकत घेऊन आपल्या भारत देशासह जगाला ज्या कोरोना ने विळखा घातला आहे त्या आजाराला ह्या देशातून व पृथ्वी तलावरून नष्ट होऊ दे आस म्हणत गाई सोडून दिल्या.

सविस्तर माहिती अशी की पुणे जिल्ह्यातील व लोणावळा येथील मुस्लिम असणाऱ्या सय्यद खिजरोद्दिन यांनी देशासह जगातील महाभयंकर अश्या सुरू असलेल्या कोरोना आजाराला या देशातून राज्यातून व पृथ्वी तलावरून नष्ट होऊ दे म्हणत त्यांनी शुक्रवार रोजी आपल्या स्वखर्चातून तीस हजार रुपये खर्च करून हिंदू धर्मात आई मानल्या जाणाऱ्या दोन गावरान गाई विकत घेऊन त्या गाईंना धुऊन त्यांच्या अंगावर झुल त्यांच्या गळ्यात फुलांचे हार तसेच त्यांची पूजा अर्चा करून त्यांना देवाच्या नावाने जसे की त्या गाईंना आता कोणी धरू शकणार नाही व जसे की त्यांची दावी मोरकी येसन अस सर्व काढून देऊन सय्यद खिजरोद्दिन जिल्हा परिषद सदस्य योगिनी थोरात यांचे पती शरद थोरात गावातील जेष्ठ नागरिक लिंबराव अण्णा थोरात तसेच भारत थोरात गणेश थोरात सफिर शेख मोहम्मद शेख मुंशी शेख समशेर शेख तसेच अन्य काही गावकऱ्यांच्या उपस्थितीत येणाऱ्या संकटाला दूर करावा हा उपक्रम राबवला आहे.

▪️▪️
मुस्लिम असून गाईंवर श्रध्दा मुस्लिम असणाऱ्या व्यक्तीला ते गाईंचे दुष्मन आहेत ते गाई कापतात खातात गाईंना मारतात त्यांना सांभाळत नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत अशी समाजात मुस्लिम समाजाबद्दल अनेक जण गरळ ओकत आसतात मात्र यांनी तसे न करता गाई वर विश्वास ठेऊन त्या गाई रोग कमी होईल त्यांच्यावर विश्वास दाखउन त्या गाई सोडून दिल्या.

error: Content is protected !!