ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

भररस्त्यात जावयानेच केला सासुचा धारदार कोयत्याने खून.

भररस्त्यात जावयानेच केला सासुचा धारदार कोयत्याने खून.

🔸अशोक काळकुटे | संपादक

‘डोळ्यात मिरची पूड टाकून खून करून मारेकरी मोटार सायकल घेऊन झाला पसार”

घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांची भेट.

▪️नंदकुमार मोरे | केज.
तालुक्यातील साळेगाव येथे महामार्गावर चाळीस वर्षीय सासूचा तिच्या जावायानेच डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार कोयत्याने मानेवर व हातावर वार करून भर रस्त्यात खून केला आहे. तर त्या महिले सोबतचा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथिल सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

या बाबतची माहिती अशी की, धायगुडा पिंपळा ता. अंबाजोगाई येथील लोचना उर्फ सुलोचना माणिक धायगुडे व तिच्या नात्यातील अंकुश दिलीप धायगुडे हे दि.२५ एप्रिल रोजी लोचना हिचा जावई अमोल इंगळे यास भेटण्यासाठी आले होते; परंतु त्यांची भेट झाली नाही परत जात असताना ते साळेगाव येथील केज-कळंब महामार्गावरील दिलीप मेडकर यांच्या संताजी हॉटेल समोर अमोल वैजिनाथ आला. त्या वेळी त्या तिघात भांडण झाले. त्या नंतर अंकुश धायगुडे यांच्या मोटरसायकलवर बसून लोचना धायगुडे केज मार्गे अंबाजोगाईकडे जाण्यास निघाली. त्या वेळी अमोलने संताजी हॉटेल समोर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार कोयत्याने अंकुशच्या हातावर वार केला. या झटापटीत लोचना धायगुडे ही मोटरसायकल वरून खाली पडली. ती खाली पडताच अमोल इंगळे याने तिच्या मानेवर व गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले. वर चुकविण्याच्या प्रयत्नात लोचना तिच्या डाव्या हातावर देखील चार-पाच खोलवर वार झालेले असून खोलवर जखमा आहेत.
दरम्यान घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पोलीस कादरी आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अंकुश यास केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक प्रथम उपचार आले यावेळी अंकुश यांनी सांगितले की अमोल इंगळे व त्याच्या सोबत अन्य एक या इसम असल्याची माहिती मिळते.
दरम्यान या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मयत महिलेचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठविले आहे.

error: Content is protected !!