ब्रेकिंग न्युज
घराला आग लागून संसारोपयोगी साहित्यासह कापूस जळून खाकबीड जिल्हा जातीपातीच्या नव्हे तर कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो-ना.धनजंय मुंडेशेवगाव तालुक्यातील अपहृत मुलींची सुटका! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अज्ञात महिलेच्या ‘फोन’ने लावला छडा..ओबीसी नेत्याला बॅनरवर डावलल्याने भुजबळ समर्थक ओबीसी मतदार पंकजाताई मुंढे यांना मतदानातून धडा शिकवणार – बापू गाडेकर तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न जि प नान्नज मुले शाळेचे आठवडे बाजारात पथनाट्यातून मतदानासाठी जनजागृती अभियानवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची   दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई मार्केट ग्राउंड वर होणार जाहीर सभा : लाखोच्या संख्येने उपस्थित रहा :- अशोक हिंगे पाटीलवनविभागातील आधिका-यांचा कारभार म्हणजे कुंपनच शेत खातंय; जिल्हाधिका-यांना तक्रार:- डॉ.गणेश ढवळेआंबेडकरी चळवळ तळागाळात पोहचविण्याचे काम युवकांनी करावे : पप्पू कागदेआ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौरा

परभणी जिल्ह्यासाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची मागणीच नसल्याने तुटवडा वाढीव मागणीची नोंद करा-अतिश नाना गरड.

परभणी जिल्ह्यासाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची मागणीच नसल्याने तुटवडा वाढीव मागणीची नोंद करा-अतिश नाना गरड.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️परभणी | प्रतिनिधी.
परभणी जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची आवश्यकते प्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून मागणीच नसल्याने जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असून जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणी प्रमाणे नोंदणी करून पुरवठा करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी विधानसभा अध्यक्ष अतिश नाना गरड यांनी दिली.
परभणी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना महामारी च्या प्रतिबंधासाठी किंवा रुग्णांच्या बरे होण्यासाठी लागणारा रेमेडीसिविर तसेच ऑक्सिजनच्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेलेले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील संसर्ग अतिशय वेगाने होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढून ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे . परंतु जिल्हा प्रशासनाकडून मागणी प्रमाणे ऑक्सिजनची नोंदणी करून शासनाकडे मागणीच केलेली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली

परभणी जिल्हयाची ऑक्सिजनची मागणी परंतु जिल्ह्यात कमी पुरवठा होत आहे. जिल्हा प्रशासनाने शासकीय दवाखान्यात लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी नोंदवलेली आहे . परंतु या मागणीत खाजगी दवाखाने समाविष्ट नसल्याने खाजगी दवाखान्यात लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या सतत वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे . तसे पाहता सगळीकडेच ही परिस्थिती असली तरी ऑक्सिजनची मागणी कमी असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आलेला आहे. ऑक्सिजन अभावी जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .
याबाबत परभणी जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यान अतिश नाना गरड यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत राज्यातील ऑक्सिजन प्लांटवर ऑक्सिजन देण्यासाठी मागणी केली असता परभणी जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनची मागणीच केलेली नसल्याचे समजले .
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी विभागीय आयुक्त मा.केंद्रेकर साहेब यांच्यासोबत दूरध्वनीव्दारे चर्चा करून जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवड्याबाबत व हलगर्जीपणा बाबत चिंता व्यक्त केली . तसेच परभणी जिल्ह्यासाठी शासकीय दवाखाने , कोविड रुग्णालया सोबतच खाजगी रुग्णालयांनासुद्धा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली. अतिश नाना गरड यांनी निदर्शनास आणून दिलेल्या या महत्वपूर्ण बाबीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून जिल्हाधिकारी परभणी यांनी तातडीने प्रस्ताव सादर केला आहे.

अनोंदणीकृत खाजगी दवाखान्यांना नोंदणी करून त्यांना सुद्धा ऑक्सिजन द्या
अतिश नाना गरड

परभणी जिल्हयात खाजगी रुग्णालयांना सुद्धा कोरोना उपचारासाठी परवानगी दिलेली आहे. परंतु काही खाजगी दवाखाने अनोंदणीकृत असून मानवतेच्या दृष्टिकोन ठेवून कोरोनाचा उपचार करीत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला असून नागरिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात धाव घेत आहे. परंतु ज्या अनोंदणीकृत दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहे त्यांना रेमडीसीवीर व ऑक्सिजनच्या कमतरतेचा फटका बसत आहे .
त्यांना सुद्धा ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे अनोंदणीकृत खाजगी रुग्णालयांकडून तातडीने प्रस्ताव मागवून त्यांना कोरोनावर उपचार करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून कोरोनाचा खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना सुद्धा ऑक्सिजन , रेमडीसीवीर इंजेक्शन तसेच इतर जीवनावश्यक औषधे मिळून मृत्यू संख्या कमी करणे शक्य होईल असे पत्र ही अतिश नाना गरड यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

प्राप्त माहिती नुसार परभणी जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालयासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी नोंदवली आहे परंतु खाजगी रुग्णालयासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणीच केले केली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. त्या अनुषंगाने माहिती घेतली असता ही बाब खरी असल्याचे हि कळते. खाजगी दवाखाण्यासाठी ऑक्सिजनची मागणी नोंदविलेली नसल्यामुळे त्यांना लागणारा ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांची हेळसांड होऊन अनेकांचे जीव धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने ऑक्सिजनच्या वाढीव मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

error: Content is protected !!