ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

लसीकरणाचा शहरात सावळा गोंधळ पोलिसांची नागरिकांना अरेरावी तर लस घेण्याआधीच मोबाईलवर लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त.

लसीकरणाचा शहरात सावळा गोंधळ पोलिसांची नागरिकांना अरेरावी तर लस घेण्याआधीच मोबाईलवर लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️प्रेमनाथ कदम | परळी.
आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरी आरोग्य लसीकरण केंद्रात आज प्रचंड गर्दी जमा झाली होती. सहज व नियोजनबद्ध पद्धतीने लस मिळावी यासाठी अनेक नागरिकांनी मोबाईलच्या माध्यमातून लसीकरणासाठी नोंदणी केली होती परंतु या नागरिकांना लस न घेता घरी माघारी फिरावे लागले. लसीकरण केंद्रावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, उपस्थित पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत अनेकांना धक्काबुक्की केली.
पुरेशी लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांचे लसीकरण झाले नाही, परतू लस न मिळालेल्या नागरिकांना लसीकरण झाले आहे असा संदेश प्राप्त झाला आहे, त्याचबरोबर लसीकरण झाल्याचे मोबाईलवर प्रमाणपत्रसुध्दा प्राप्त झाले आहे.
लस न मिळता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने अनेक नागरिकांनी आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. शहरात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही, लसीकरण केंद्रात आज केवळ दुसरा डोस शिल्लक आहे, पहिला डोस शिल्लक नाही, अशी माहिती दोन तास रांगेत थांबल्यानंतर देण्यात येत होती. त्यात पोलिसांची अरेरावीमुळे अनेक नागरिक वैतागल्याचे दिसून आले. काही नागरिकांना मात्र, लशीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना लशीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस वेळेत मिळाला नाही.

लसीकरणा आधी प्रमाणपत्र कसे? लसीकरणाच्या नियोजनाबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, ऑनलाईन लसीकरण नोदणीची मला माहिती नाही, तुम्ही बीड येथे संपर्क करा असे उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आले. तसेच लसीकरण केंद्राबाहेर सूचना फलक नसल्याने नागरीकांची तारांबळ उडाली होती. आरोग्य विभागाचा आणि पोलिस प्रशासनाचा असा नियोजनशून्य कारभार सुरू राहिला तर भविष्यात अधिक कोरोना संक्रमण होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

पोलिसांची नागरिकांना अरेरावी व दमदाटी का?

लस उपलब्ध आहे का अशी चौकशी करण्यासाठी लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिकांना पोलिसांनी धक्काबुक्की केली, तसेच आमच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केल्यास तुमच्या विरोधात ३५३ चा गुन्हा दाखल करून तुम्हाला आता टाकतो, असा दम देण्यात आला. वयोवृध्द आणि अपंग व्यक्ती तासनतास रांगेत उभे होते, वयोवृध्द आणि अपंगांना पोलिसांनी आधार देण्याऐवजी, पोलिस अशा व्यक्तींना दमदाटी करत होते. पोलिस नागरिकाच्या सुरक्षेसाठी आहेत का?, लोकांना धमकी देण्यासाठी आहेत, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!