ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

येळंब (घाट) प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नवीन नियमावली ; विनाकारण गर्दी करू नका.

येळंब (घाट) प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नवीन नियमावली ; विनाकारण गर्दी करू नका.

🔸अशोक काळकुटे | संपादक

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून केवळ ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांनाच पुढील काही दिवस लस मिळणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने लसीकरण करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. तर बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत फक्त ४५ वर्षापुढील नागरिकांनाच लस देण्यात येणार आहे. काल निघालेल्या आदेशानुसार ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांचे फक्त दुसऱ्या डोस साठीच लसीकरण होणार आहे. पहिला डोस कोणालाही दिला जाणार नसल्याचे या आदेशात नमूद आहे. त्याप्रमाणे येळंब (घाट) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बलराज राठोड आणि डॉ.प्रियंका सिंघण यांनी वारंवार होणारी गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी उद्या दिनांक १४ मे २०२१ रोजी फक्त दुसऱ्या डोससाठीच लसीकरण होणार असून पहिल्या डोस साठी नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी व्यवस्थित रांगेत उभे राहून आम्हाला व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. उद्याच्या लसीकरण सत्रासाठी ज्या लोकांनी दुसरा डोस घेतला नाही किंवा घेण्यास उशीर झाला आहे. त्यांची यादी आमच्याकडे असून त्या सर्व लोकांना फोन करून बोलावण्यात येईल तेवढ्याच लोकांनी उद्या लसीकरण केंद्रावर यावे. तसेच कोविशिल्ड चे डोस सकाळी ०९:०० ते ११:०० पर्यंत सुरू राहतील आणि कोव्हॅक्सीनचे डोस सकाळी ११:०० ते ०१:०० वाजेपर्यंत सुरू राहतील अशीही माहिती त्यांनी दिलेली आहे.

error: Content is protected !!