ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

४५ वर्षांवरील दिव्यांगांचे उद्या होणार थेट लसीकरण ; ऑनलाईन करण्याची आवश्यकता नाही.

४५ वर्षांवरील दिव्यांगांचे उद्या होणार थेट लसीकरण ; ऑनलाईन करण्याची आवश्यकता नाही.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड जिल्ह्यात यापुर्वी वेळोवेळी लसीकरणा बाबतच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. सुरूवातीला ४५ वर्षां पेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींनाच लस देण्यात आली. यासाठी थेट लसीकरण केंद्रावर आधार कार्ड घेऊन नोंद केल्यानंतर लगेच लस दिली जात होती. यानंतर लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी एक दिवस अगोदर रजिस्टरला नोंद करून दुसऱ्या दिवशी लस देण्यात येत होती.
त्यानंतर ही गर्दी कमी झाली नाही यामुळे पुन्हा प्रशासनाने लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना एक वेब साईट दिली होती. त्यावरून ऑनलाईन करून दिलेल्या मोबाईल नंबर वर नागरिकांना मेसेज आल्यानंतरच दिलेल्या वेळेत जाऊन लस घेता येत होती. आता पुन्हा यामध्ये बदल करण्यात आला आहे. अपंग/ दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करून अपंग/दिव्यांग व्यक्तींना उद्या येळंब (घाट) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर थेट लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका सिंघण यांनी दिली आहे. लस घेण्यासाठी सोबत आधार कार्ड आणि उपलब्ध असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणावे. तसेच येण्यासाठी सुविधा नसेल त्यांची सोय संबंधित ग्रामपंचायतीच्या वतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणाला येण्यासाठीची सुविधा उपलब्ध होत नसेल त्यांनी डॉ. प्रियंका सिंघन यांना +91 88569 23235 या क्रमांकावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!