ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांवर आली “कोणी लिंबू घेता का लिंबू ” म्हण्याची वेळ*..!

मुख्य संपादक गंगाधर काळकुटे

बातणी प्रकाशक दिपक आनवणे

बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांवर आली “कोणी लिंबू घेता का लिंबू ” म्हण्याची वेळ*..!

“कोरोणामूळे उन्हाळ्याच्या हंगामातही लिंबू खरेदीकडे व्यापारी फिरकेना;आठवडी बाजार बंद असल्याने लिंबू उत्पादक शेतकरी हैराण”

केज !नंदकुमार मोरे!सध्या लिंबू उत्पादक शेतकऱ्यांपुढे कोरोना काळात आर्थिक संकट उभे ठाकले आहे. एक तर भाव गडगडले, त्यात व्यापारी बागांकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाहीत. परिणामी झाडावरील लिंबू गळून मातीत मिसळत आहेत. कोरोना संकटामुळे बाजारात मालाला उठावच नसल्याने लिंबाला भाव नसल्याचे केज तालुक्यात व परिसरात चित्र पाहावयास मिळत आहे.

लाँकडाऊन मुळे बाजारपेठेत त्याला मागणीच नसल्याने अद्यापही शेतकऱ्यांकडून लिंबूची पाहिजे तशी तोड सुरू झाली नाही.बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेतील मार्च महिन्यात तोडणीस आलेले लिंबू माल एप्रिल महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत लिंबू विक्रीचा विशेष करुन हंगाम असतो. व चांगला भावही मिळतो.पण सलग दुसऱ्याही वर्षी लॉकडाऊनमध्ये बाजार पेठेत मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.

केज तालुक्यासह परिसरात मोठ्या संख्येने लिंबाच्या बागा आहेत.उन्हाळ्याच्या हंगामात लिंबूला किलोला ८० ते १०० रुपये प्रति किलो भाव मिळतो. पण,कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे शासनाने लाँकडाऊन घोषित केल्याने आठवडे बाजारसह रेस्टॉरंट, हॉटेल, लिंबू रसवंत्या बंद आहेत.त्यामुळे लिंबाची मागणी घटली. तसेच बाजारपेठेत ग्राहकही कमी झाले आहेत. आता फक्त मे महिना व एप्रिलचे काही दिवस माल विक्रीसाठी उरले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामातही लिंबाला मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

“सी” जीवनसत्त्व असणाऱ्या लिंबाचा खाद्यपदार्थासह औषधांसाठी वापर होतो. कोरोनासह इतर अनेक आजार रोखण्यासाठी लिंबू आरोग्यवर्धक आहे. लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लिंबू लागवडीसह व्यवसायाकडे वळल्याचे दिसत आहे. मागील महिन्यापासून तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याने लाहीलाही होणाऱ्या शरीराला थंडावा देण्यासाठी व ऊर्जा टिकविण्यासाठी लिंबाचे सरबत जास्त प्रमाणात लोक घेत आहेत. कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी व रोग प्रतिकारशक्ती वाढ विण्यासाठी देखील काळा चहा पिण्यावर नागरिकांचा भर असून यामध्ये लिंबाचा वापर केला जातो. उसाचा रस काढताना देखील लिंबाचा वापर केला जातो. सध्या सर्वत्र बंदची अवस्था असल्याने लिंबाची मागणी घटली असून लिंबाच्या घटत्या किमतीने उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

चौकट-सद्यस्थितीत लिंबाच्या एका गोणीला ७०-८० रुपये असा दर मिळतो. हे लिंबं तोडण्यासाठी ४०-५० रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर वाहतूक व बाजारपेठेतील इतर खर्च पाहता, शेतकऱ्यांच्या हाती काहीही येत नाही.

error: Content is protected !!