ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाची धडाकेबाज कारवाई

गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाची धडाकेबाज कारवाई

 

लोणी काळभोर प्रतिनिधी :श्रीनिवास पाटील

 

गर्दी मारामारी व खुनाचा प्रयत्न

करून आठ महिन्यांपासून फरार असलेले आरोपी आकाश शांताराम काळे व नवीन संजय गायकवाड या दोन फरार आरोपींना

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 10/11/2020 रोजी मौजे वाघोली गावचे हद्दीत बकोरी फाटा येथे गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून चारचाकी व टेम्पो चालक यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचाच राग मनात धरून टेम्पो चालक व त्याचे इतर 10 ते 12 साथीदारांसह येऊन फिर्यादी सुनील रामदास गाडे वय 31 वर्षे रा. बाईफ रोड, वाघोली, पुणे यांना व त्यांचे दाजी यांना कोयत्याने हातावर पायावर मारहाण करून गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. वगैरे मजकूर वरून गुन्हा दाखल होता. सदर प्रकरणी या पूर्वीच आरोपी ऋषभ शेवाळे, संकेत पाटील, अभिषेक होळकर, विशाल वाजे, ऋतिक ससाणे, रोहित भांडे यांना गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आली होती.

दिनांक 03/06/2021 रोजी मा. वरिष्ठांचे आदेशाने युनिट 6 चे हद्दीत कोंबींग ऑपरेशन करण्याचे आदेश झाल्याने युनिट 6 चे पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांनी आपल्या पथकास माहिती कळवून युनिट ६ चे हद्दीत रवाना झाले. युनिट ६ पथकातील पो शि ऋषिकेश व्यवहारे व ऋषिकेश ताकवणे यांना यातील पाहिजे आरोपी आकाश काळे व नवीन गायकवाड हे मांजरी खुर्द येथे नदी पात्रा लगत स्मशाभूमीजवळ आले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली असता सदर माहिती पोलीस निरीक्षक श्री. माने यांना कळवून आरोपींना पथकाने सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे 1) आकाश शांताराम काळे वय 21 वर्षे रा. तुकाई दर्शन, हडपसर, पुणे 2) नवीन उर्फ नवा संजय गायकवाड वय 20 वर्षे रा. हांडे वाडी बायपास, हडपसर, पुणे अशी सांगितली. त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास कामी लोणीकंद पोलीस ठाणे यांचे स्वाधीन करण्यात आले आहे. यातील आरोपी आकाश काळे हा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याचेवर हडपसर, लोणीकंद, कोंढवा, वानवडी या पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून तो लोणीकंद पोंस्टे कडील गुन्ह्यात फरार होता.

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री अशोक मोराळे, मा.पोलीस उपायुक्त श्री श्रीनिवास घाडगे मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 श्री लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -6 चे पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, ऋषिकेश ताकवणे,ऋषिकेश व्यवहारे ऋषिकेश टिळेकर, सचिन पवार, नितीन मुंडे, शेखर काटे,प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे ,नितीन धाडगे यांनी केली आहे.

error: Content is protected !!