ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

आ. विनायकराव मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल ; जर कोणाचं बरं वाईट झालं तर मेटे साहेब पाप कुठे फेडाल?

आ. विनायकराव मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल ; जर कोणाचं बरं वाईट झालं तर मेटे साहेब पाप कुठे फेडाल?

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीडमध्ये काल प्रशासनाने परवानगी दिलेली नसताना आमदार मेटेंनी कोरोना नियमही झुगारत हजारोंचा मोर्चा बीड शहरातून काढला. यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार बीड येथील शहर पोलीस ठाण्यात आमदार विनायकराव मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यासह २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मोर्चात सहभागी झालेल्या तब्बल अडीच ते तीन हजार लोकांवरही गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. आणखी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे. काल झालेल्या मोर्चा संदर्भात आज विनायकराव तुकाराम मेटे आणि नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल किंवा न मिळेल परंतु नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे.
प्रशासनाने परवानगी दिलेली नसताना जर मोर्चा काढला तर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा प्रशासनाने यापुर्वीच दिला होता. परंतु मेटेंनी राजकीय फायद्यासाठी मराठा तरूणांच्या भविष्याचा कसलाही विचार केलेला दिसत नाही. यादरम्यान कोरोनाचाही संसर्ग वाढण्याचीही दाट शक्यता आहे. आमदार मेटे साहेब मोर्चातुन संसर्ग वाढला आणि समाजातील एखाद्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं तर ते पाप कुठे फेडाल ? साहेब तुमचं ठिक आहे पण त्या हजारो बांधवांवर तुमच्या या निर्णयामुळे गुन्हे दाखल झाले. त्यांनी कधीपर्यंत कोर्टात चकरा मारायचा आणि कशा ? त्यांचं आयुष्य उज्वल करण्याचं तुम्ही स्वप्न दाखवलं परंतु ते भंग झालं आहे. त्यांच्या आयुष्यात आणखी एक मोठं संकट आणुन सोडण्याचं काम आपण केले आहे. याचे उत्तर आपण पुढे समाजाला काय देणार?

मोर्चेकरी मराठ्यांनो तुमच्या सोबत आमदार मेटे यांनी केला घात.

आमदार विनायकराव मेटे यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी एक दिवस अगोदर स्टेटमेंट जारी केलं होतं. या व्हिडिओ स्टेटमेंट मध्ये कोणावरही गुन्हे दाखल होणार नाहीत याची हमी मी घेतो अशा पद्धतीचं स्टेटमेंट छातीठोकपणे त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. परंतु आज अडीच ते तीन हजार मोर्चेकरी मराठ्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आमदार विनायकराव मेटे कुठल्या बिळात बसले आहेत हे मात्र समजायला कठीण आहे. खोटं बोलून मराठा समाजाला मोर्चासाठी बोलावून समाजासोबत आमदार विनायकराव मेटे यांनी मोठा घात केला आहे.

error: Content is protected !!