ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून ; उरुळी देवाची येथील धक्कादायक घटना.

अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून ; उरुळी देवाची येथील धक्कादायक घटना.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️श्रीनिवास पाटील | पाटील.
हवेली : उरुळी देवाची येते एका इसमाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती.पोलीस तपासात संशयास्पद मृत्यूचे खुनात रूपांतर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.यात लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध सुरू ठेवण्यात अडथळा ठरणाऱ्या पतीला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन त्यानंतर त्याचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले.याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियराला अटक केली.

अश्विनी मनोहर हांडे (वय १९ , रा उरुळी देवाची) गौरव संतोष सुतार (वय. १९, रा उत्तम नगर मंतरवाडी) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.मनोहर हांडे (वय २७, रा उरुळी देवाची ) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकेतेन बाळासाहेब निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येते मनोहर हांडे यांचा २४ मे रोजी मृत्यू झाला होता. याबाबत मयताची पत्नी अश्विनी हांडे हिने तिचा पती मनोहर हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते.याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर हे करत होते.

तसेच समांतर तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथक करीत असताना दिनांक ४ जून रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू महानोर व पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर साळुंखे यांना मनोहर हांडे यांचे मरणाबाबत सांशकता असल्याची खबर मिळाली.

तपासादरम्यान अश्विनी व गौरव यांचे लग्नापूर्वीपासून प्रेम संबंध असून त्यातूनच घातपात झाला असल्याचा पोलिसाना संशय आला.पोलिसांनी गौरव याला ताब्यात घेऊन चौकशी तपास केला असता त्याने व अश्विनी हिने मिळून मनोहर हांडे यास सुरुवातीस झोपेच्या गोळ्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले व नंतर तोंड व गळा दाबून खून केल्याचे कबूल केले.तर अश्विनी हिला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता,त्यांनी सांगितले की यांचे दोन वर्षापासून प्रेमसंबंध असून अश्विनीचा पती मनोहर यास प्रेमसंबंध बाबत समजले होते.

तसेच मनोहर हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सुमारे १५ दिवसापासून घरीच राहून उपचार घेत होता. अनैतिक संबंधास अडसर ठरत होता. त्यामुळे त्यांनी मनोहर याचा खून करून तो कोरोनाने मेल्याचा बनावाचा कट रचला होता.त्याप्रमाणे ३० मे रोजीच्या रात्री गौरव याने अश्विनीस झोपेच्या गोळ्या आणून दिल्या.

मनोहर हांडे याने अश्विनीशी जानेवारी मध्ये लग्न केले होते. गौरव व अश्विनी यांचे प्रेमसंबंध होते.त्यात मनोहर याचा अडथळा येत होता.गौरव याने अश्विनीस झोपेच्या गोळ्या आणून दिल्या.तिने मनोहर यास दुधातून या गोळ्या दिल्या.त्यामुळे मनोहर गाढ झोपी गेल्यावर मध्यरात्री २ वाजता त्यांनी मनोहारचा गळा दाबून खून केला.त्यानंतर गोळ्यांचे पॅकेट फेकून दिले.त्यानंतर गौरव तेथून निघून गेला व अश्विनी हिने वरील मजल्यावर राहणारी तिचे आईस बोलून घेऊन मनोहर हा झोपेतून उठत नाही,असे सांगून झोपेतच तो कोरोना आजाराने मेला असल्याचा बनाव केला.तिने पोलिसाना देखील मनोहर कोरोनाने मेला असल्याचे सांगत होती.मात्र शविच्छेदना अहवालामध्ये मनोहर चा गळा दाबल्या मुळे व श्वास गुदमरला मुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले.

सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मयत नोंद दाखल करून पुरावा उपलब्ध नसताना फक्त खबरी मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्याने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. आणि आरोपींना अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे)सुभाष काळेे अधिक तपास करत आहेत.

या कामगिरी मधे तपास पथकामध्येे सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर,उपनिरीक्षक केतन निंबाळकर,पोलीस अंमलदार नितीन गायकवाड,शंकर नेवसे,अमित साळुंखेे, श्रीनाथ जाधव,सुनील गलोत,प्रमोद गायकवाड, रोहिदास पारखे, दिगंबर साळुंखे, निखिल पवार, राजेश दराडे, बाजीराव विर, कुदळे सहभागी होते.

error: Content is protected !!