ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक संपन्न ; समाजाला फक्त छत्रपतींकडुनच अपेक्षा.

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक संपन्न ; समाजाला फक्त छत्रपतींकडुनच अपेक्षा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सध्या राज्याभर खासदार संभाजीराजे छत्रपती हे फिरत आहेत. दरम्यान त्यांनी आता आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आहे. “समाज बोलला आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला” असे आवाहन लोकप्रतिनिधींना करत खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पहिले आंदोलन कोल्हापूर येथे छेडले यामध्ये सर्व पक्षाचे जाती धर्माचे लोकप्रतिनिधी सहभागी झाले आणि समाजाच्या आरक्षणासाठीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. आता मराठा समाजाला फक्त आणि फक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडूनच अपेक्षा उरल्या आहेत. बाकीच्या राजकीय नेत्यांचे आश्वासनं आणि आंदोलनं हे फक्त राजकारण्यांचा राजकारणाचा भाग उरला आहे‌. याच लढ्यातील दुसरे आंदोलन आज नाशिक येथे पार पडले या आंदोलनात देखील मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. यामुळे राज्य,केंद्र सरकारला पुन्हा एकदा छत्रपतींनी घाम फोडला आहे. यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करावा लागणार आहे. आज नाशिक येथील मूक आंदोलन पार पडल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची एक बैठक देखील पार पडली आहे. या बैठकीत विविध प्रश्नावर सर्व समन्वयकांचे मत जाणून घेतले. यावेळी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती आणि राज्य समन्वयकांची उपस्थिती होती.
या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक तथा राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे यांनी देखील आपले मत मांडले आहे.

error: Content is protected !!