ब्रेकिंग न्युज
जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

आरक्षण पुनर्स्थापित करा अन्यथा आंदोलन तीव्र करू,खा.प्रितमताई मुंडे यांचा सरकारला इशारा

बहुजन समाज भोळा पण त्याला पंकजाताई नावाचा तिसरा डोळा

आरक्षण पुनर्स्थापित करा अन्यथा आंदोलन तीव्र करू,खा.प्रितमताई मुंडे यांचा सरकारला इशारा

पंकजाताईंच्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद,प्रितमताईंसह असंख्य कार्यकर्त्यांना अटक व सुटका

परळी । दि.२६ ।

वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली,आज शाहू महाराजांच्या जयंतीदिनी त्याच वंचित उपेक्षितांना आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला आंदोलन करावे लागत आहे.राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून बहुजन समाजाची दिशाभूल करू पाहत आहे,बहुजन समाज भोळा असला तरी त्याला पंकजाताई नावाचा तिसरा डोळा आहे.ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राज्य सरकारला दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले होते.परळी शहरातही इटके कॉर्नर चौकात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,जुगलकिशोर लोहिया,फुलचंद कराड,दत्ताप्पा इटके,निळकंठ चाटे,पवन मुंडे,राजेश गित्ते,जयश्री मुंडे,डॉ.शालिनी कराड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने बहुजन समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की आरक्षणाचा लाभ सर्वच पक्षातील ओबीसींना मिळाला,राज्यातील सत्ताधारी देखील आरक्षणामुळे सत्ता उपभोगत आहेत.परंतु आरक्षण रद्द झाल्यानंतर एकाही मंत्री किंवा आमदाराने राजीनामा देण्याची हिंमत दाखवली नाही.राज्यातील मंत्र्यांनी निर्णय घेण्याऐवजी आंदोलनाची भाषा करणे त्यांच्या नाकर्तेपणाचे उदाहरण असल्याचा घणाघात देखील यावेळी त्यांनी केला.

सर्वसामान्यांसाठी पंकजाताई मुंडे साहेबांच्या भूमिकेत

सत्ताधाऱ्यांच्या उदासीन धोरणांमुळे जेंव्हा सर्वसामान्यांवर अन्याय होत असे तेंव्हा मुंडे साहेब त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका घेत असत.आज देखील ओबीसींवर अन्याय झाला आहे,या अन्याया विरोधात लढा उभारून पंकजाताईंनी मुंडे साहेबांची भूमिका घेतली आहे.

परळीसह सिरसाळा,धर्मापुरीत चक्काजाम,वाहनांच्या लांबच लांब रांगा

पंकजाताई मुंडे यांनी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला परळी तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.परळीसह तालुक्यातील सिरसाळा,धर्मापुरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामुळेवाहतूक बंद पडली होती,परिणामी रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे बघण्यात आल्या.

••••

error: Content is protected !!