ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

*पावनधाम येथे गुरूपौर्णिमा साजरी* *एकवीस हजार पानांनी मंदिरातील गाभार्याची सजावट*

केज (प्रतिनिधी) तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे दरवर्षी प्रमाणे हजारो भक्तांच्या उपस्थितीत होणारा गुरूपौर्णिमेचा कार्यक्रम यावर्षी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
संत तुकोबाराय पावनधाम येथे संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा वारकरी महामंडळाचे मराठावाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने संत तुकोबारायांच्या गाभार्यात एकवीस हजार पानांची सजावट सोमनाथ बोरगाव येथील वारकरी आणि महाराजांचे भक्त ज्ञानोबा नागोराव सोमवंशी यांनी केली. दिवसभर सोशल डिस्टन्स ठेवून महाप्रसादाची सोय ज्ञानेश्वर बभ्रूवाहन जाधव यांनी केली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची किर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी बोलताना बोराडे शास्त्री म्हणाले कि, कोराणाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, हिच विठोबा-तूकोबाच्या चरणी प्रार्थना.
सायंकाळी पावनधाम येथील संस्थानच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या वतीने गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची पाद्य पूजा करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल महाराज, अशोकबापू महाराज, जनार्धन महाराज,हनुमंत शिरसट महाराज, पारेकर बप्पा, गणपत पांचाळ यांनी केले.

error: Content is protected !!