ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरवले… प्राचार्य डॅा.सिद्राम डोंगरगे

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरवले…
प्राचार्य डॅा.सिद्राम डोंगरगे

लातूर प्रतिनिधी। ;-थोर स्वातंत्र सैनिक, माजी आमदार तथा महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे आधारवड सिद्रामप्पा नागप्‍पा आलुरे यांचे आज पहाटे साडे तिन वाजता सोलापूर येथील अश्विनी रूग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या या निधनामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरवले असे प्रतिपादन महाविद्यालयात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी व्यक्त केले.
यावेळी रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॅा.शिवप्रसाद डोंगरे, डॅा.संजय गवई, सचिन कुदळे, बसवराज हिंगणे, रोहित चवळे, वाले, जावळे, ब्याडगे दत्ता, शुभम बिरादार, आनंद खोपे, माकणे योगीराज, राम पाटील आदी उपस्थित होते
पुढे बोलतांना डॅा. सिद्राम डोंगरगे म्हणाले की, लिंगायत वीरशैव समाजाने आज शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील हिरा गमावला आहे. आदरणीय गुरुजींनी ग्रामीण भागात शिक्षण संस्थेची स्थापना करून ज्ञानगंगा गोरगरीब होतकरू मुलां-मुलींची पर्यंत पोहोचवली. आलुरे गुरुजींच्या निधनाने शिक्षणावर अनन्य साधारण निष्ठा असलेला तत्वनिष्ठ राजकीय नेता काळाने हिरावून नेला आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. मराठवाड्याचे सानेगुरुजी अशीही त्यांची ख्याती होती त्यांच्या निधनाने महात्मा बसवेश्वर शिक्षण संकुलावर शोककळा पसरली आहे असेही ते म्हणाले

error: Content is protected !!