ब्रेकिंग न्युज
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या कार्यालयास भेट ..!सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबाआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे -प्रदिप थोरवेपंकजाताईच राजकारण सर्व समावेशक ,त्या खासदार होण , बीड जिल्ह्याच्या विकासाचा दरवाजा खुला करणजिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय ‘ मशिन अभावी तर स्वरातीचे सिटी स्कॅन ४ महिन्यांपासून बंद रूग्णांची हेळसांड  ; शासनकर्ते उदासीन:- डॉ.गणेश ढवळेघुलेचे कार्यकर्ते हाती कमळ धरणार?भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रुचला नसल्याची चर्चाचारा दरात वाढ जनावरांना बाजाराची वाट पाण्याचीही टंचाई कडब्याचा दर तीन हजारांवरनिलेश लंकेच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते घर ते घर प्रचारबैलजोडी सेवेचे मानकरी वस्ताद सहादु कुऱ्हाडे यांचा सत्कार माऊली मंदिरात ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचा उपक्रमआष्टी येथे होणाऱ्या शरदचंद्रजी पवार यांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – राम खाडे

मुख्यमंत्री दौऱ्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले; घोषणाबाजीने तणावाची स्थिती |

 

जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले याच पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरबाधित जिल्यांचा दौरा करताना दिसून येत आहे. त्यातच आज मुख्यमंत्री ठाकरे सांगली जिल्याच्या दौऱ्यावर आले होते.

मात्र यावेळी निवदेन देण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी एकच गोंधळ उडाला. निवेदन देता न आल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडले. त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, अशी घोषणाबाजी सुरू केली.

मुख्यमंत्री ठाकरे हे सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. दुपारी बारा वाजता त्यांनी आयर्विन पुलावरून कृष्णा नदीकाठची पाहणी केली. त्यानंतर ते हरभट रोडकडे रवाना झाले. हरभट रोड येथील चौकात शिवसेना, भाजप, व्यापारी एकता असोसिएशन, सर्वपक्षीय कृती समिती, गुंठेवारी समितीसह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी थांबले होते. त्यांच्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे गाडीतून उतरून येत असतानाच कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला. एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली.

error: Content is protected !!