ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मुलीचा तोल गेल्या मुळे आई वाचवण्यासाठी गेली मात्र दोघींचाही विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यु.

“मुलीचा तोल गेल्यामुळे आई वाचवण्यासाठी गेली मात्र दोघींचाही विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू…….!

नांदुर घाट !प्रतिनिधी!.
श्रीकांतराजे जाधव.
केज तालुक्यातील बानेगाव येथे शुक्रवारी मुलगी विहिरीजवळ खेळत असताना मुलीचा अचानक तोल जाताना पाहिल्यानंतर आई वाचवण्यासाठी गेली .परंतु वाचवत असताना आईचा देखील तोल गेला व दोघीही मायलेकी विहीरीत बुडून मृत्यूमुखी झाल्या, सविस्तर माहिती अशी की आशा सुंदर जाधवर राहणार वडजी ,तालुका .वाशी, जिल्हा .उस्मानाबाद या आपल्या माहेरी बानेगाव येथे दोन दिवसापूर्वी आल्या होत्या परंतु 16 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान आशा जाधवर यांची आई शेतामध्ये गेल्या होत्या आणि वडील बाहेर गावी गेले होते. आशा व त्यांची मुलगी बाहेर थोडं गेले असता विहिरी जवळ बसले होते. मुलगी खेळत खेळत असताना विहिरीजवळ पोहोचली परंतू मुलीचा तोंल गेल्याचे पाहून आई तीला वाचवण्यासाठी गेली परंतु आईचा देखील मुलीला वाचण्यांमध्ये तोल गेला, व दोघीही विहीरी पडून मृत्यूमुखी पडल्या, त्यामुळे आशा सुंदर जाधवर व त्यांची मुलगी अठरा महिन्यांची त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ,काही तासानंतर आई व वडील घरी आल्यानंतर आशा व मुलगी आढळून नाही आल्यामुळे शोध घेत होते. त्यानंतर विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले पाच पंप टाकून 16 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पर्यंत विहिरीतले पाणी निघाले, त्यानंतर मुलीचा हात आईच्या हातामध्ये असल्याचे निदर्शनास आले मातृत्वाचे ते चित्र पाहून सर्व जण गहिवरले , कांही दिवसा पूर्वी आशा जाधवर यांचे पती कोरोणा संसर्गाची लागण झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता ,आशा या पुणे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या पतीची दुर्दैवी घटना काही महिन्यांपूर्वीच झाली असताना नियतीने घात केला या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय नांदुर घाट येथे पोस्टमार्टम साठी प्रेत रात्री दाखल झाले. त्यानंतर केज पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शंकर वाघमोडे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे. जमादार जसवंत शेप. पोलीस नाईक रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली व माय लेकी चा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टम साठी दाखल केले त्यानंतर सकाळी अकरा वाजता माय-लेकींना एका चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी सर्व परिसरातील गावातील नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. सदर घटनेची केज पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

error: Content is protected !!