ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

*तीन लाख रु. साठी विवाहितेचा छळ : नवरा सासू सासऱ्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल*!! ——————————————————-

*केज! प्रतिनिधी* :-
केज तालुक्यातील हदगाव डोका येथे विवाहितेचा तिच्या सासरच्या लोकांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रु घेऊन ये म्हणून तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा नवरा, सासू सासरे व इतर नातेवाईक अशा सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, हदगाव ता. केज येथील भाग्यश्री अजित यादव वय २१ वर्ष या विवाहितेस तिच्या सासरी तिच्या नवऱ्याला ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रु. घेऊन ये. अशी मागणी करीत असत. मात्र भाग्यश्री हिचे आईवडील हे गरीब असल्याने ते पैसे देऊ शकले नाहीत. म्हणून भाग्यश्री हिला सर्वांनी मारहाण करून उपाशी पोटी ठेवणे व जाच जुलूम करून नांदवण्यास नकार देत घरातून हाकलून दिले. तसेच तिला शारिरीक व मानसिक त्रास दिला.

भाग्यश्री यादव हिने दि. १६ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात तिचा नवरा अजित रामदास यादव, सासरा रामदास गोवर्धन यादव, सासु अयोध्या रामदास यादव, आजे सासरा, दिर, नणंदव नंदावी यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे त्या नुसार सात जणांच्या विरुद्ध गु र न ४५२/२०२१ भा दं वि ४९८(अ), ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

प्रभारी ठाणे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पंथकाच्या महिला पोलीस जमादार रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

————————————————-

error: Content is protected !!