ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

*लाडेगाव प्रकरणी सर्व दलित संघटनाचे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली* *आमरण उपोषण सुरू* —————————————————–

केज!प्रतिनिधी(दि. २१):- केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान प्रकरणा वरून तालुक्यातील सर्व दलित पक्ष व संघटना आक्रमक झाल्या असून दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या बॅनरखाली एकत्र येऊन दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी सर्वपक्षीय आमरण उपोषणाला बसले आहेत.

लाडेगाव ता. केज येथील गायरान प्रकरणा वरून सर्व दलित संघटना व पक्ष एकत्र आले आहेत. दि. २१ सप्टेंबर मंगळवार रोजी ११:३० वा. केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. 

उपोषणार्थींच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत. त्या मागण्या अशा आहेत; युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप दहिफळे व बिट जमादार डोईफोडे यांना निलंबित करावे. दलित समाजातील अतिक्रमण धारकांना विरोध करण्यासाठी या गायरान जमिनीवर राबविण्यात येणार असलेले वनीकरण आणि नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात यावा. गायरान जमिनितील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे. गायरान जमिनीशी अर्था-अर्थी काही एक संबंध नसणारे सवर्ण समाजातील गावगुंड हे दलित समाजावर अन्याय करीत असताना व त्यांच्या गुन्हे दाखल असतानाही प्रशासन कार्यवाही करीत नसल्याने दलित वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दलित समाज हा गुन्हेगारी प्रवर्गातील नाही तरी आकसापोटी त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सामाजिक सलोखा व ऐक्य अबाधित ठेण्याचा प्रयत्न करावा. या मागण्या आहेत.

चौकट :-

सामाजिक न्याय राज्यमंत्री व पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मुळेच दलित समाजावर अन्याय अत्याचार होत आल्याचा आरोप रिपाइंचे दीपक कांबळे व बहुजन वंचित आघाडीचे निलेश साखरे यांनी केला असून केज मतदार संघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी याकडे लक्ष दिले नाही अशीही उपोषणकर्त्याची मागणी आहे.

error: Content is protected !!