ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सोलापूर तालुका पोलीस ठाणेची कामगिरी

सोलापूर संपादक -महेश पवार

प्रतिनिधी- संतोष विभूते

ऑपरेशन परिवर्तन दरम्यान वडजी तांडा, मुळेगाव तांडा व सेवा तांडा येथे अवैध गावठी दारूच्या हातभट्या उदध्वस्त

एकूण 3 लाख 42 हजार 200 रुपये रक्कम किंमतीचे11 हजार 800 लिटर गुळमिश्रीत रसायन, 59 प्लॅस्टिक व लोखंडी बॅरेल जागेवरच नष्ट

सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात मौजे वडजी तांडा, मुळेगाव तांडा व सेवा तांडा या परिसरात चोरून अवैधरित्या हातभट्टी दारूच्या मध्यातून गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या भट्टया उदध्वस्त करण्याच्या अनुषंगाने शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर व अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली व सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी पोलीस ठाणे कडील पोलीस जंमलदार यांचेसह दिनांक 4/1/2023 रोजी मुळेगाव तांडा, वडजी तांडा व सेवा तांडा या ठिकाणी विशेष मोहिम राबवून अवैधरित्या चालणा-या दारुच्या हातभट्याच्या ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली आहे.

तिन्ही ठिकाणी अवैधरित्या चालणा-या गावठी हातभट्यावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 3 लाख 42 हजार 200 रुपये किंमतीचे त्या मध्ये 11 हजार 800 लिटर गीत रसायन, 59 प्लॅस्टीक व लोखंडी बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य, अवैध दारूच्या हातभट्या जागेवरच उध्दवस्त करुन प्लॅस्टीक व लोखंडी बॅरेल जागीच फोडून त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे. सदरची कारवाई करीत असताना पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची ड्रोनचा उपयोग केला आहे.

वडजी तांडा, मुळेगाव तांडा व सेवा तांडा येथे अवैध दारूच्या हातभट्टया उध्दवस्त केलेल्या ठिकाणी एकूण 3 इसमा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये एकूण 3 गुन्हे दाखल केले असून गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडुन होत आहे.

यापूढे देखील सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी ऑपरेशन परिवर्तनच्या अंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरुन चालणा-या अवैध देशी गावठी दारूच्या हातभट्या उदध्वस्त करून कारवाई केलेल्या आहेत.

यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणा-या इसमाची गोपनियरित्या माहिती प्राप्त करून त्यांचे विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांनी सांगितले आहे.
सदरची छापा कारवाई शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक,सोलापूर व अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, पोलीस नाईक रहिम सय्यद, आशिफ शेख, शंकर गुजगोंड, पोलीस अंमलदार सचिन मागाडे, ड्रोन चालक सुरवसे, पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण कडील दंगा नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे.

error: Content is protected !!