ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र

मुंबई(प्रतिनिधी) :- राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तसे संकेत दिले आहेत. शिक्षकांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी हे संकेत दिले. ऑफलाईन परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही काही शंका असल्यास शिक्षकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नावली
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा लेखन सराव व्हावा. तसेच त्यांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा, यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून (SCERT) ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. ‘एससीईआरटी’च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध केली जाणार आहे. http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर विषयाप्रमाणे प्रश्नावली अपलोड करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना खास मार्गदर्शन

कोरोना काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास झाले आहेत. काही ठिकाणी ऑफलाईन वर्ग झालेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. वार्षिक परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या ताण तणावासाठी मार्गदर्शन आणि समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची सल्ला, मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची यादी https://maa.ac.in/index.php?tcf=counselors_list या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!