ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

महिलांना धमकवल्या प्रकरणी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल 

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

महिलांना धमकवल्या प्रकरणी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल 

बीड(प्रतिनिधी) :- एकीकडे वाळूमाफियांच्या अरेरावीमुळे गेवराई तालुका चिंताग्रस्त आहे तर चक्क दुसरीकडे चक्क तहसीलदारांवरच गुन्हा दाखल झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी महिलांना घरात घुसून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. घरातील कोणाचीही परवानगी न घेता घरात घुसून महिलांना धमकवल्या प्रकरणी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह सात ते आठ अनोळखी व्यक्तींवर गेवराई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन महिलांच्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, तिन्ही फिर्यादी महिला गेवराईच्या समृद्धी नगर भागातील रहिवासी असून त्यांच्या घरी विनापरवाना जाऊन तुम्ही वाळु प्रकरणातील आरोपी लपवुन ठेवले आहेत, असं म्हणत धमकवल्याचं या महिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. मात्र अगोदरच गेवराईमधील अवैध वाळु उपशाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता वाळुचा वाद घरापर्यंत गेला असल्याचे दिसून येतंय. फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे तहसीलदार सचिन खाडेंसोबत आणखी सहा ते सात लोक कोण होते? ते पोलीस तपासात स्पष्ट होईल.

कुणीही असो, दोषींवर कारवाई होणारच, महिला आयोग आक्रमक

तर या सर्व प्रकरणी आम्ही जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करणार असल्याचे सांगत महिलांवर अन्याय होत असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच, मग तो कोणीही असो अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण यांनी दिली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षांचेही चौकशीचे आदेश

बीड जिल्ह्यातील गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी घरात घुसून महिलांना धमकावल्याची माहिती समाजमाध्यमाद्वारे समजली. याबाबत तहसिलदार सचिन खाडे यांच्याविरोधात तीन महिलांनी गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी बीड पोलिसांनी यावर योग्य ती कार्यवाही करावी व त्याचा अहवाल तीन दिवसांच्या आत राज्य महिला आयोगास सादर करावा, असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

error: Content is protected !!