ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

चंद्रपूर जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर; तर अकोला आठव्या स्थानी

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

चंद्रपूर जगात तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उष्ण शहर; तर अकोला आठव्या स्थानी

बीड(प्रतिनिधी):- अकोला जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी जगभरातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये स्थान मि‌ळविले
सोमवारी अकोला हे देशातील दुसऱ्या तर जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. तेथे ४२.९अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील गडचिरोली (३९.४) जिल्हा वगळता सगळ्याच जिल्ह्यातील तापमान ४० अंशांहून अधिक होते. यात अकोलाखालोखाल चंद्रपुरात ४२.२ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. ‌नागपुरातही ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसांत तापमान अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मंगळवारपासून देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या सौम्य लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यात गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ व राज्यस्थान यांचा समावेश आहे. विदर्भात मंगळवार ते गुरुवार हे तीन दिवस बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशीम अर्थात पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात नागपुरातही पारा वाढणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.

error: Content is protected !!