ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

 

सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक संकटाना कंटाळून या नऊ जणांनी आत्महत्या केली आहे. सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जातो.

संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे. विष पिऊन कुटुंबातील 9 सदस्यांनी आतम्हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होतं. या डॉक्टरशी बराचवेळ फोनवरुन संपर्क केला जात होता. मात्र संपर्क होऊ न शकल्यानं संशय व्यक्त करण्यात आला. तसंच सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजाही उघडण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोनवरुन सातत्यानं संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कुणीच फोन उचलला नाही.

अखेर ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर धक्कादायक चित्र समोर दिसलं. डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. विष घेऊन या सगळ्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आता कसून तपास केला जातो.

error: Content is protected !!