ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

पालघर जिल्हातील आदिवासी महिलांची चायना कंदील नको पर्यावरण पूरक बांबू पासून बनलेले कंदील खरेदी करण्याची साद

पालघर जिल्हातील आदिवासी महिलांची चायना कंदील नको पर्यावरण पूरक बांबू पासून बनलेले कंदील खरेदी करण्याची साद

सेवा विवेक सामजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी महिलांनी दिवाळी साठी बांबू पासून पर्यावरण पूर्वक कंदील तयार केले आहेत. दिवाळी चा सण जवळ आल्याने या महिलांनी बनवलेल्या कांदिलाना उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी होत आहे .
पालघर जिल्हातील विविध गावतील आदिवासी महिला सेवा विवेक सामजिक संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत. येणाऱ्या दिवाळी सणासाठी नागरिकांनी चायना कंदील न घेता पर्यावरण पूरक बांबू पासून बनलेले कंदील घ्यावे अशी ती विनंती करत आहे.या आदिवासी महिला शेतकरी असून सेवा विवेक सामजिक संस्थेने दिलेल्या बांबू पासून हस्तकला या प्रशिक्षण वर्गात त्यांनी बांबू पासून विविध दर्जेदार वस्तू तयार करायला शिकल्या आहेत.आपण ह्यांनी तयार केलेले कंदील घेवून संस्थेच्या कामात हातभार लावावा असे संस्थेच्या प्रशिक्षण व विकास अधिकारी सौ. प्रगती भोईर यांनी विनंती केली आहे.
महिलांनी तयार केलेले कंदील सेवा विवेक च्या वेबसाइट www.sevavivek.com var विक्रीसाठी उपलबध आहेत. तसेच आपण प्रगती भोईर 7798711333 ह्यांना संपर्क करून हे कंदील घरपोच मागवू शकता.
सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा ह्यातूने सेवा विवेक ने पुढाकार घेतला आहे. अश्या महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते.पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबू पासून उत्तम दर्जेदार प्रयावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.

error: Content is protected !!