ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा ग्राहकांची फसवणुक झाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार कराव-मिलींद पवार

अनिलकुमार कदम/सातारा
ग्राहकांच्या हिताचे निर्णय शासन तर घेतलच आहे, परंतु एकाद्या ग्राहकांची फसवणुक झाल्यास ग्राहकाने जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी.तक्रारीची पडताळणी करुन ग्राहकांना न्याय दिला जाईल, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री. पवार बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते,हिंदुस्थान पेट्रोलियमचे प्रभात कुमार, भारतीय मानक ब्युरोचे प्रज्योत दहीकर, सह जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा ग्राहक मंचाचे काम संपूर्ण पणे मराठीत चालते असे सांगून श्री. पवार म्हणाले,आजचा राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहकांना त्यांच्यासाठी असणारे हक्क व कर्तव्याची जाणीव करुन देणारा कार्यक्रम आहे.आज अनेक संघटना ग्राहकांसाठी काम करीत आहेत. या संघटनांनी ग्रामीण भागात ग्राहकांसाठी असणाऱ्या हक्काची व कर्तव्याची जनजागृती करावी. ग्राहकांसाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत. ग्राहकांची फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करावी,असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रत्येक नागरिक हा ग्राहक असून ग्राहकांची व्याप्ती मोठी आहे. ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याची जाणीव करुन देण्यासाठी 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.कोणतेही वस्तु खरेदी केल्यानंतर पावती घ्यावी आपण पैसे देवून सेवा खरेदी करत असतो. ग्राहकांना त्यांचे अधिकार व कायद्याची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते-किसवे यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमा प्रारंभी कन्याशाळा सातारा येथील विद्यार्थीनींमार्फत जागो ग्राहक जागो या विषयावर पथनाट्य सादर केले.

error: Content is protected !!