ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

श्रीमती आशा दाभाडे “महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ” पुरस्काराने सन्मानित

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि;

दरवर्षि नंबर वन न्युज चॅनल अमरावती व्दारा विविध क्षेत्रात कार्य करणा-या महिलांना त्यांच्या अतुलनिय कार्यासाठी देण्यात येणारा “महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ” गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिनांक 12 मार्च 2024 रोजी डाॅॅॅॅ.पंजाबराव देशमख कृषि विद्यापीठ अकोला येथील विस्तार शिक्षण संचालनालय अकोला येथे मोठ्या थाटात पार पडला.

यामध्ये श्रीमती आशाताई दाभाडे यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मातृछाया सोशल सेंटर अंतर्गत मदर वेरोनीका कौटुंबीक समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून शेकडो कुटुंबाना विभक्त होण्यापासून त्यांच्या सोबत संवाद घडवुन आणुन एकत्र करण्याचे ऊत्कृष्ट काम केले. आशाताई दाभाडे ह्या सलग 15 वर्षांपासून सातत्याने कौंटुबिक समस्येच्या विळख्यात हरवलेल्या कुटुंबात प्रेम निर्माण करण्याचे काम निष्ठेने तसेच सेवाभावनेने करतात. आजवर हजारो कुटुंबियांना आनंद देण्याचे व त्यांना एकत्र करण्याचे काम त्यांनी प्रामाणिक पणे निरंतर केले. प्र्रत्येक स्त्रीला सांगत असतात की, पति आणि पत्नी ही संसाराची दोन चाके आहेत. दोन्ही चाके जर व्यवस्थितपणे फिरु लागली तर आयुष्य हे सुरळीत चालणार, पण जर का तसे नाही झाले तर आयुष्याला कुणाची तरी नजर लागल्यासारखे होईल, आणि शेवटी संसार उध्वस्त होतो. असे होऊ नये म्हणून त्या सातत्याने कुटुंबामध्ये जाऊन त्यांना समन्वयाची जाणीव करुन देत असता.

तसेच आई जिजाऊ प्रमाणे शिवबा घडवतांना अवघ्या दिड महिण्याच्या बाळाला जिवनात कठीन परिस्थितितुन संघर्ष करित आपल्या बाळाला आज बॅंकेत ऊच्च पदावर कार्य करण्या इतपत सक्षम केले. म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्रीमती आशाताई दाभाड़े यांना मिळालेल्या पुरस्कारमुळे त्यात्यावर अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्व स्तरावरुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या पुरस्कार वितरण समारोहामध्ये डाॅ.उंदिरवाडे संचालक कृषि विस्तार शिक्षण संचालनालय डाॅ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, प्रकाशदादा साबळे जि.प.माजी सदस्य अमरावती, डाॅ. दिलीप काळे माजी प्राचार्य समाजकार्य महा. बडनेरा, पौर्णिमाताई सवाई, इंजी मनोज जयस्वाल, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झिंगुबाई बोलके, गजाननदादा कडु, दिपाताई तायडे, नितीन ऊभाड, प्रा. संजिव सलामेमा, सुहास मोरे, अश्विनीताई गीते हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजन नंबर वन न्युज चॅनल अमरावतीचे नितीन पाटिल मुळे यांनी केले होते.

error: Content is protected !!