ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

परमार्थ केला तरच होतो, संसार नाही केला तरी होतो – महंत श्रीरंग महाराज डोंगरे

परमार्थ केला तरच होतो, संसार नाही केला तरी होतो – महंत श्रीरंग महाराज डोंगरे
मादळमोही । प्रतिनिधी;-  गेवराई तालुक्यातील तांदळा येथे वैकुंठवाशी हभप. महंत महादेव महाराज श्री क्षेत्र नारायणगड यांची तांदळा येथे गेल्यावर्षी मृर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यानिमित्ताने प्रत्येक महिना वारी एकादशीच्या दिवशी येथे हरिकीर्तन असते त्या अनुशंगाने दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ९ ते ११ यावेळत हभप महंत श्रीरंग महाराज डोंगरे, श्रीक्षेत्र संस्थान घोलपदरा यांच्या मधूर वाणीतून अमृततुल्य हरी कीर्तन पार पडले.
      तालुक्यातील तांदळा येथे कामदा एकादशी महीनावारी निमित्ताने हभप महंत श्रीरंग महाराज डोंगरे यांनी देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। असोनी संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा ।। ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ।। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील पहिला क्रमांकाचा अभंग घेतला यावेळी महाराजांनी बोलताना सांगितले, माऊलींचा हरिपाठ उघडला की पहिले शब्द समोर येतात ते म्हणजे “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी”. केवळ हे चार शब्द वाचताच जिवणाचा सार समजून येतो. किमान क्षणभर देवाच्या समोर हात धरून डोळे मिटून त्या वातावरणाचा अनुभव घेतला त्यांना अनुभूती येते. देव भक्तीचा भुकेला असतो आणि परमार्थाचे कुठे मोजमाप होऊ शकत नाही. इथे अर्धवट परमार्थ  कमी येत नाही. तसे संसार अर्धवट केला तरी होतो आणि नाही केला तरी होतो पंरतु परमार्थ केला तर होतो. संसार करत असताना मुलीने सासूला आई समान मानावे आणि सासूने सुध्दा सुनेला मुली सारखे वागावे. रंग वर्णावरून दिसते रुप आणि मरणोत्तर दिसते ते स्वरूप जीवनात एकदातरी राम नामस्मरण करा. संसारात पैसा किती कमवला तरी सुख नाही एकदा रामाचे नामस्मरण केले तरीही मनाला सुख प्राप्ती होते. या कीर्तन सेवेसाठी तांदळा येथील संदिपान शेंबडे, अभिमान शेंबडे, भाऊसाहेब शेंबडे यांनी योगदान दिले तर गावातील महिला पुरुष वारकरी टाळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!