ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

पुलावरुन व्यागरन गाडी नदीत कोसळली ; जिवीत हानी टळली 

पुलावरुन व्यागरन गाडी नदीत कोसळली ; जिवीत हानी टळली
चिंचवण जवळील घटना ; सहा लोक जखमी
वडवणी: हनुमंत मात्रे धारुर कडून वडवणीकडे येत आसलेली व्यागनर चारचाकी गाडी कुंडलिका नदीपात्राच्या पुलावरुन खाली कोसळली असून यामध्ये कोणतीच जिवीत हानी झाली नाही तर यामधील सहा प्रवाशी किरकोळ जखमी असल्याची माहिती प्रथमदर्शी लोकांनी दिली आहे. हि घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धारुरकडून वडवणी कडे येत आसलेली व्यागनर चार चाकी गाडी एमएच १२ सीसी ६५७७ हि गाडी चिंचवण जवळील कुंडलिका नदीच्या पुला जवळ आली गाडी भरधान असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी थेट पुलावरुन खाली कोसळली यामध्ये गाडी मोठ्या झुडपावर आदळली असल्याने या घटनेमध्ये जीवित हानी टळली असल्याचे वृत्त आहे. या गाडीमध्ये सहा पुरुष आणि सहा महिलासह तीन मुल असल्याची माहिती मिळाली आहे. सदरील घटना माहिती होताच चिंचवणकरांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशाना सुखरुप बाहेर काढत चिंचवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले यानंतर बीड जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती प्रथमदर्शी यांच्याकडून मिळाली आसून वेळ आली होती परंतु काळा आला नव्हता अशी गत या अपघात दृश्यावरुन दिसून येत आहे.
error: Content is protected !!