ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

घराघरातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने ८ जुनला नारायणगडावर यावे – मनोज जरांगे 

अंमळनेर दि.२३ (प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीत कोणाला मतदान करा हे सांगणार नाही, परंतु ज्याला पाडायचे त्याला ईतके ताकतीने पाडा की त्यांच्या पाच पिड्या निवडणुक लढणार नाहीत ईतक्या मताने पाडा असे अवाहन करीत विधानसभेला राज्यात ९२ मतदार संघावर मराठा समाजाचे प्राबल्य असल्याने विधानसभा निवडणुकीत संपुर्ण ताकतीने उतरणार असल्याची घोषणा मराठायोद्धा मनोजदादा जरांगे यांनी करीत ८ जुन रोजी नारायणगड येथे होणार्या विशाल सभेला अंमळनेर परिसरातील घराघरातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे अवाहन केले.
पुणे येथून धामणगाव – अंमळनेर मार्गे बीडला जात असताना गावोगावी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले . अंमळनेर येथे छोटेखानी स्वागताला मोठे स्वरूप येत मोठ्या संख्येने समाजबांधव एकवटला होता. गावात येताच ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. स्वागतसभारंभानंतर छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी समाजबांधवांना संबोधित केले ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळत नव्हते त्यामुळे समाजाची मुले नौकरी, शिक्षणापासून वंचित राहत होती, आता कुणबी नोंदी सापडल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे. सगेसोयरे यांची मागणी बाकी आहे ती देखील मागणी पुर्ण करण्यासाठी माझ्या जिवाची बाजी लावीत आहे, आणि हे मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, भले यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर असे सांगत मराठा समाजाने एकत्र येणे काळाजी गरज आहे. झालेली एकजुट फुटु देऊ नका, लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाच्या प्रचाराला जाऊ नका, कोणाला मतदान करा हे सांगणार नाही परंतु ज्याला पाडायचेय त्याला ईतक्या मताने पाडा की, त्यांच्या पाच पिड्या निवडणुकीत कोणी उभा राहीले नाही पाहिजे. पाडण्यात देखिल मोठा विजय असतो असे सांगितले. या प्रसंगी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.

error: Content is protected !!