ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

खेड तालुक्यातील आडगाव सोसायटीच्या ४४५ सभासदांना पीक कर्जाचे वाटप

दैनिक सूर्योदय पुणे
संजय दाते पाटील
पाईट-[ राजगुरुनगर] २२ एप्रिल २०२४
आडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने एकूण 445 सभासद शेतकऱ्यांना 3 कोटी 67 लाख 86 हजार 750 रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन चिंधू पिसाळ, सचिव लक्ष्मण शिंदे यांनी दिली.
आडगाव सोसायटीचे कार्यक्षेत्रात आडगाव, सुपे – सातकरवाडी, टेकवडी, वाघु – साबळेवाडी ,कान्हेवाडी खुर्द इत्यादी गावांचा समावेश असून 445 सभासद आहेत. पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी 445 सभासद शेतकऱ्यांच्या 350/35 हेक्टर क्षेत्रासाठी पीक कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानुसार चेअरमन चिंधु पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चे सेवा निवृत्त सचिव व सोसायटीचे संचालक सतीश चांभारे, विष्णू साबळे, संजय बेंडूरे, उल्हास बुढे, भाऊ पानमंद ,जितेंद्र गोपाळे, सतू गोपाळे , सतीश मोहन,लक्ष्मण गोपाळे व मोहन गोपाळे, सगुणाबाई लिंबाळे , सुपे चे माजी सरपंच गिरजू चांभारे, उपसरपंच दिनेश बुढे , सुपेचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष साहेबराव सातकर, वाघुचे माजी सरपंच वसंत साबळे, सुपे ग्रामपंचायतीचे सदस्य अरुण पिसाळ, आडगावचे माजी उपसरपंच बबन बाबुराव गोपाळे, बँकेचे पाईट शाखेचे व्यवस्थापक तुकाराम धादवड, विकास अधिकारी प्रशांत रौंधळ, कॅशियर साहेबराव शिंदे, सचिव लक्ष्मण शिंदे आदिंच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक कर्ज
वितरीत करण्यात आले .
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ठरवून दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत शून्य टक्का व्याजाने पीक कर्ज दिल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक अरुण
चांभारे यांनी केले आहे.
या वेळी नथू गोपाळे , साहेबराव ससाणे, महादू बेंडुरे, भागूजी पिसाळ , नामदेव बेंडुरे, लक्ष्मण बेंडुरे, शिवाजी काळभोर, गणपत बेंडुरे, चांगदेव बुढे, शिवाजी सातकर, बबन खेडेकर आदी सभासद शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!