ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

तहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?

तहसीलदार खोमणे साहेब गेवराई शहरातील संपूर्ण शासकीय जमीन भू-माफिंया यांच्या घशात घालणार का ?

तलाठी पांढरे यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर शासकीय जमिनीवर प्लॉटिंगचा गोरख धंदा सुरू

गेवराई प्रतिनिधी;- गेवराई तहसील कार्यालयास तहसीलदार खोमणे हे रुजू झाल्यापासून शहरातील भू-माफिंयांनी डोके वर काढले आहे. गेवराई शहरात व आजूबाजूच्या परिसरात शासकीय जमिनीवर हे भूमाफिया प्लॉटिंग काढून ती विकत आहेत परंतु याकडे तलाठी पांढरे व तहसीलदार संदीप खोमणे यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
गेवराई शहरांमध्ये शासनाच्या अनेक गायरान जमिनी आहेत परंतु भु-माफिंया त्या जमिनी शासकीय अधिकाऱ्यांशी संगमत करून विकत असल्याचे शहरात बोलले जात आहे. तसेच गेवराई तहसीलला तहसीलदार म्हणून संदीप खोमणे रुजू झाल्यापासून भू-माफियांनी वर डोके काढले आहे. खोमणे यांच्या अगोदर आरक्षित जमिनीवर प्लॉटिंग करणे ओपन पेस न सोडणे असे प्रकार चलत होते परंतु खोमणे आल्यापासून चक्क शासकीय जमिनीवरच प्लॉटिंगचा गोरख धंदा सुरू आहे. तलाठी पांढरे यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जमिनीवर हा गोरख धंदा मोठा गाजावाजा करून सुरू आहे तर, अनेकांनी तिथे प्लॉट ही बॉण्डवर खरेदी केले असुन प्लॉट खरेदी करणाऱ्यांना ती जमीन शासकीय असल्याची माहिती नसून त्यांची फसवणूक होत असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व प्रकाराला प्रशासकीय अधिकारी जबाबदार असल्याचे बोलले जात असून त्यांचे ही यात हात ओले झाल्याची चर्चा गेवराई शहरात सुरू आहे.

error: Content is protected !!