ब्रेकिंग न्युज
जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकर

गेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुच

गेवराई बसस्थानक परिसरात महिलाचे दागीने चोरीच्या घटना सुरुच

बसमधे चढतांना तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी

गेवराई प्रतिनीधी;-येथील बसस्थानकात अंबड गावी जाण्यासाठी प्रवासी महिला बसमध्ये चढतांना अज्ञात चोरट्याने गर्दिचा फायदा घेत महिलेच्या अंगावरील ३तोळ्याचे दागीने चोरल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या घटनेची सविस्तर माहिती अशी की शहरातील रंगार चौकात राहणारी एक महिला काही कामा निमीत्त अंबड जि जालना गावी जाण्यासाठी बस मधे चढत असताना
अज्ञात चोरट्याने गर्दिचा फायदा घेत हातचालाकी करूण महिलेच्या अंगावरील सोन्याच्या साखळीचे, ३तोळ्याचे गंठन काढुन घेतल्याची घटना दि २५रोजी दु १२, वा सुमारास घडली आहे
महिलेला आपल्या गळ्यात दागीने नसल्याचे जाणवल्यावर तिने आरडा,ओरड,सुरु केली बसस्थानक परिसरात काही वेळ घटना पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दि केली होती या प्रकरणी; अशा जालिंदर अतकरे ,वय ५८रा रंगारी चौक गेवराई जि बीड यांच्या फिर्यादिवरुण दागिने चोरी गेल्या प्रकरणी दि २५रोजी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा पुढिल तपास सफौ,सुतार करत आहे

गेवराई बसस्थानक परिसरात दागीने चोरीच्या घटनेत वाढ, चोरटे मोकाट,?

गेवराई बसस्थानक परिसरात दिवसे दिवस प्रवासी महिलेच्या दागिने चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे परंतु अद्याप एकाही चोरट्याला पकडण्यात पोलीसांना यश आले नाही त्यामुळे प्रवाशात भिती पसरली आहे
बसस्थानक परिसरात पोलीस चौकी नाही,किंवा साधा एखादा हवालदार देखील नाही वाढत्या चोरीच्या घटना पोलीसांना देने घेणे नाही का पोलीस प्रशासनानी अद्याप एकाही चोरट्याला पकडले नाही त्यामुळे गेवराई पोलीस ठाण्याचा आढावा पोलीस अधीक्षकांनी घ्यावा मागणी नागरीकातुन होत आहे

error: Content is protected !!