ब्रेकिंग न्युज
घाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊतवाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान 

राहुल बोडखे यांनी घेतली रविकांत तुपकरांची भेट.

राहुल बोडखे यांनी घेतली रविकांत तुपकरांची भेट.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️दिपक मापारी | रिसोड.
वस्त्रोद्योग महामंडळाचे मा.अध्यक्ष आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पं.स.सदस्य राहुल बोडखे यांनी बुलढाणास्थित स्वाभिमानी हेल्पलाईन सेंंटरला भेट घेतली.त्यामध्ये खरिप हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना पिक विमा कंपन्यांनी विमा भरुनहि जाचक अटी लावत पळवाटा काढून शेतकऱ्यांना कुठलिही नुकसान भरपाई दिली नाही.शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा प्रश्न, शेतातील विजेचा प्रश्न,अवकाळी गारपीट, केंद्र सरकारने लादलेले कायदे, दिल्लीतील शेतकरी आंदोलन,कोरोना परिस्थिती अशा अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली.राहुल बोडखे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात चालू असलेल्या कोविड हेल्पलाईन विषयी माहिती रविकांत तुपकरांना दिली.कोरोनाच्या काळात रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युवक काँग्रेस करत असलेल्या कामाचं तुपकरांनी कौतुक केलं.कोरोना महामारीच्या काळात रूग्णांना सहकार्य करणे म्हणजेच खरं समाजकार्य असे प्रतिपादन रविकांत तुपकरांनी केले.

error: Content is protected !!