ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

ठाकरे सरकारने ओबीसीचे आरक्षण घालवल्याचा आरोप ; राज्‍यभर २६ जूनला चक्‍काजाम आंदोलन.

ठाकरे सरकारने ओबीसीचे आरक्षण घालवल्याचा आरोप ; राज्‍यभर २६ जूनला चक्‍काजाम आंदोलन.

🔸अशोक काळकुटे | संपादक

जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही – योगेश टिळेकर.

गेल्‍या दिड वर्षात राज्‍यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून कोणताच समाज या सरकारच्‍या काळात समाधानी नाही. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द झाले. ठाकरे सरकारला आलेले हे अपयश लपविण्‍यासाठी त्‍यांनी ओबीसीचे आरक्षण घालविले असा घणाघाती आरोप करून आरक्षण प्रश्‍नासंदर्भात संघर्ष नाही केला तर येणारी पिढी माफ करणार नाही. त्‍याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्‍हा परिषद, नगरपालिका यासह कोणत्‍याच स्‍थानिक स्‍वराज्‍य  संस्‍थेच्‍या येत्‍या काळात होणाऱ्या निवडणूकीत ओबीसीचा उमेदवार दिसणार नाही. राज्‍यातील ३५० जातीतून एकही व्‍यक्‍ती निवडणूकीसाठी उभा राहता कामा नये हाच हेतू राज्‍य सरकारचा दिसून येतो. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत निवडणूका घेवू नयेत हीच भाजपाची भूमिका असल्‍याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली
लातूर जिल्‍हयातील भाजपाच्‍या लोकप्रतिनिधीसह ओबीसी मोर्चाच्‍या पदाधिकाऱ्यांची बैठक ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्‍यक्ष योगेश टिळेकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या अध्‍यक्षतेखाली लातूर येथे सोमवारी झाली. या बैठकीस औश्‍याचे आ. अभिमन्‍यू  पवार, प्रदेश प्रवक्‍ते  गणेशदादा हाके, माजी आमदार गोविंदअण्‍णा केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्‍हेकर, बब्रुवान खंदाडे, शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष राहूल केंद्रे, सभापती गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, सांस्‍कृतिक सेलेचे प्रदेशाध्‍यक्ष शैलेश गोजमगुंडे, जिल्‍हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबकआबा गुटे, प्रा. विजय क्षीरसागर, अशोकराव केंद्रे, ओबीसी मोर्चाचे मराठावाडा संपर्कप्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, शरद पेठकर, जिल्‍हाध्‍यक्ष बापूराव राठोड,  दिपाताई गिते, अॅड. जयश्रीताई पाटील, स्‍वाती जाधव, ज्ञानेश्‍वर चेवले, दिलीप धोत्रे, मनिष बंडेवार यांच्‍यासह अनेकांची प्रमुख  उपस्थिती होती.
राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यासह इतर अनेकजण ओबीसीच्‍या आरक्षण संदर्भात निर्णय घेण्‍याचा अधिकार असताना नौटंकी करत आहेत. आरक्षण रद्द झाल्‍याने जबाबदारी स्‍वीकारून त्‍यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करून ओबीसीचे आरक्षण सन्‍मानाने परत द्यावे यासाठी राज्‍यभर येत्‍या २६ जून रोजी चक्‍काजाम आंदोलन करून ओबीसीचा आक्रोश व्‍यक्‍त केला जाणार आहे अशी माहिती या बैठकीत योगेश टिळेकर यांनी दिली.
या बैठकीत बोलताना जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, लोकनेते स्‍व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज असते तर ओबीसीचे आरक्षण रद्दच झाले नसते असे सांगून  लातूर जिल्‍हा हा भाजापाचा बालेकिल्‍ला आहे. या जिल्‍हयातील सर्वच विधानसभेत भाजपाचे हे चक्‍काजाम आंदोलन राज्‍याचे लक्ष केंद्रीत करणारे आक्रमक मोठया ताकतीने होईल हे आंदोलन ओबीसीचेच नव्‍हे तर भाजपाचे आहे. त्‍यामुळे सर्वांनी या चक्‍काजाम आंदोलनात मोठया संख्‍येनी सहभागी व्‍हावे असे आवाहन केले.
प्रारंभी देविदास काळे यांनी प्रास्‍ताविक केले तर शेवटी ओबीसी मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष बापुराव राठोड यांनी आभार मानले. या बैठकीस भागवत सोट, उषा रोडगे, सुभाष जाधव, सुरेंद्र गोडभरले, दिग्‍वीजय काथवटे, मिनाताई सुर्यवंशी, संध्‍या जैन, वसंत करमुडे, राजेश वाघमारे, पद्माकर चिंचोलकर, तात्‍याराव बेद्रे, ललिता कांबळे, सुरेखा पुरी, शिवा सिसोदिया, बन्‍सी भिसे, प्रशांत पाटील, अरविंद नागरगोजे, काशिनाथ गरीबे, मनोहर पटणे, सुनिल पाटील, संतोष मुक्‍ता,  बाळासाहेब होळकर,  शिवाजी बैनगिरे, हणमंत देवकते, सुरेश बुड्डे, काशिनाथ ढगे, राजकिरण साठे यांच्‍यासह जिल्‍हाभरातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

error: Content is protected !!