ब्रेकिंग न्युज
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगी

मुख्यमंत्री दौऱ्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले; घोषणाबाजीने तणावाची स्थिती |

 

जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले याच पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुरबाधित जिल्यांचा दौरा करताना दिसून येत आहे. त्यातच आज मुख्यमंत्री ठाकरे सांगली जिल्याच्या दौऱ्यावर आले होते.

मात्र यावेळी निवदेन देण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी एकच गोंधळ उडाला. निवेदन देता न आल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडले. त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, अशी घोषणाबाजी सुरू केली.

मुख्यमंत्री ठाकरे हे सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. दुपारी बारा वाजता त्यांनी आयर्विन पुलावरून कृष्णा नदीकाठची पाहणी केली. त्यानंतर ते हरभट रोडकडे रवाना झाले. हरभट रोड येथील चौकात शिवसेना, भाजप, व्यापारी एकता असोसिएशन, सर्वपक्षीय कृती समिती, गुंठेवारी समितीसह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी थांबले होते. त्यांच्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे गाडीतून उतरून येत असतानाच कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला. एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली.

error: Content is protected !!