ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सातारा महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाची जोरदार तयारी |

 

सातारा | सातारा महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधकांनी सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच आता सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने सुद्धा राज्यातील सत्ता नसलेल्या महानगर पालिकेवर विजयाचा भगवा फडकावण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना पधाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे.

आज दुपार २:०० वाजता समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व मेळाव्याचे संयोजक सचिन मोहिते यांनी दिली. या मेळाव्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती असल्याने या मेळाव्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

सातारा शहर व तालुक्‍यातील कार्यकर्ते व कार्यकारिणी सदस्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सातारा पालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरू झाली आहे. पक्षाच्यावतीने स्वतंत्र पॅनेल निवडणुकीत उतरवायचे की महाविकास आघाडीचा फार्मुला वापरायचा, याचा निर्णय लवकरच होणार आहे.तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने पक्षात असलेले मतभेद मिटवण्याचा बानुगडे-पाटील यांचा प्रयत्न आहे. या मेळाव्यात पक्षाची ताकद दिसावी, अशी शिवसैनिकांची अपेक्षा आहे

error: Content is protected !!