ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

भिवेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

दैनिक सूर्योदय पुणे
प्रतिनिधी : विनायक जठार
राजगुरुनगर : जनावरे शेतात घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना खेड तालुक्यातील भिवेगाव या ठिकाणी घडली असून लक्ष्मण रामभाऊ वनघरे रा. भिवेगाव, ता.खेड (वय ५०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापती श्री विठ्ठल ढवळा वनघरे यांचे चुलत भाऊ असून आपल्या परिवारासोबत भिवेगाव येथे राहत होते.  लक्ष्मण रामभाऊ वनघरे हे गुरुवार दि. १९  रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास  शेताच्या बाजूला गवतामध्ये जनावरे चारत होते. बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भिवेगाव व आजूबाजूचा परिसर हा डोंगराळ व घनदाट अरण्याचा आहे. त्यामुळे सदर घटनेने आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी भिवेगाव ग्रामस्थ व आजूबाजूच्या गावातून करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील बिबट्याची वाढती संख्या व मानव वस्तीतील वावर हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. वन विभागाचे संपूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक बोलून दाखवत आहेत.

error: Content is protected !!