ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

आशा कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे घेण्याचा निर्णय

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै. महाराष्ट्र सूर्योदय

आशा कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे घेण्याचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यातील ७२ हजार आशा व गटप्रवर्तक त्यांच्या मागण्यासाठी १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर होते. हा संप मिटविण्यासाठी विविध सत्ताधारी नेत्यांनी त्याबाबत पुढाकार घेतला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख मागण्या सोडविल्याने ऐन दिवाळीतील हा संप मागे घेण्यात आला आहे

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने वेळोवेळी चर्चा झाली. बुधवारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यासंदर्भात उपोषण, निदर्शने, जेलभरो आंदोलन सुरू होते. आशा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आरोग्य मंत्री सावंत तसेच अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसेकर यांच्याकडे चर्चा होऊन प्रमुख मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने आज झालेल्या बैठकीत घेतला. दिवाळीपूर्वी झालेल्या बैठकीत संप मागे घेण्यात आला.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील आशा कृती समिती वतीने १८ ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या या संपात ७२ हजार आशा व सुमारे साडेतीन हजार गटप्रवर्तक संपावर गेल्या होत्या .

संप काळात आरोग्यमंत्री सावंत यांनी आशा कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये वेतनवाढ केली. आशा व गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये दिवाळी भेटदेखील देण्याचे जाहीर केले. गटप्रवर्तकांना आशा कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतनवाढ केल्याने आणि कंत्राटी दर्जाबाबत कोणचताही निर्णय न केल्याने असंतोष होता. आता संप मागे घेण्यात आला आहे.

error: Content is protected !!