ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

पंढरपूर तालुक्यातील चळे येथे एक जानेवारी ला लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सव सोहळा

सोलापूर संपादक – महेश पवार

पंढरपूर तालुक्यातील चळे येथे लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सव सोहळा सोमवार 1जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे, तरी रामभक्तांनी व भाविकांनी जास्त जास्त संख्येने उपस्थित राहून या सोहळ्यातील श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन, सोहळ्याच्या निमित्ताने वनवासामध्ये असलेल्या वनवासी रामभक्तांनी बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील श्री हनुमान मंदिरात ग्रामस्थांशी बोलताना केले आहे.

लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्यानिमित्त मंगळवार 19/12/2023 रोजी सकाळी 8.00 च्या सुमारास गावातील श्री महादेव मंदिरात पूजाअर्चा करुन वनवासास निघालेल्यांचा यथोचित सत्कार करुन,या चौदा दिवसांच्या वनवासी परिक्रमेला सुरुवात झाली.सदरच्या वनवासी परिक्रमेचा गोरमाळे येथील सहावा दिवस होता.
या वनवासी परिक्रमेत रामचंद्र शिंदे,आनंदा खिलारे,युवराज वाघमारे,समाधान वाघ,शिवाजी वाघमारे,संजय कुंभार,भारत बनसोडे,आप्पा वाघ,बापू वाघमारे,रामकृष्ण शिक्रे,विश्वास वाघमारे यांच्या सह इतर सात वनवासी बांधव सामील झालेले आहेत.
बऱ्याच वर्षांपासून तीर्थक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत दिव्यभव्य मंदिरा ची निर्मिती होवून,त्या मंदिरामध्ये श्री प्रभु रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी,एवढीच इच्छा आम्हां सर्व वनवासी बांधवांची होती.परंतु आमची ही इच्छा येत्या बावीस जानेवारी ला साधुसंतांच्या सान्निध्यात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असल्याने व आमच्याही गावात येत्या एक जानेवारीला लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सवाचा सोहळा संपन्न होत असल्याने,हा दुग्धशर्करा योगच आहे असे म्हंटल्यास काहीही वावगे ठरणार नाही,असे मत याप्रसंगी वनवासी परिक्रमेतील रामभक्तांनी केले.

error: Content is protected !!