ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

वसुंधरा कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संजय कुंभार

वसुंधरा कला महाविद्यालय, जुळे सोलापूरच्या वतीने आहेरवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा . डॉ. जवाहर मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, स्वयंसेविका व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करीत असताना
“राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो” उद्गार काढले. प्रा. डॉ. जवाहर मोरे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महापुरुषांना आदर्श मानून समाज व राष्ट्राच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. टी. ए. देशमुख स्वयंसेवक व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करीत असताना म्हणाले की, स्वयंसेवकांनी स्वतःच्या प्रगतीसोबत आपले गाव व शहराचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शरणप्पा बमनगी, ग्रामस्थ शिवशरण पुजारी यांनी स्वयंसेवक व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक योसेफ कांबळे व स्वयंसेविका कु. मंगल शिवशरण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुचिता गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक योसेफ कांबळे यांनी करून दिला आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. धनंजय मोगले यांनी मानले तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका कु. मंगल शिवशरण यांनी केले. यावेळी सरपंच सुवर्णा दिंडोरे, उपसरपंच नीलाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य अंबरनाथ रामपुरे, शौकत इनामदार ग्रामस्थ बसवराज माळी, प्रा. डॉ.ए. बी. पाटील व प्रा. डॉ. एम.टी. घंटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

error: Content is protected !!