ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

5 व 6 फेब्रुवारीला दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संतोष विभुते

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 5 व बुधवार दि.6 रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.
सोलापुरातील नेहरू नगर येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सोमवार दि. 05 फेब्रुवारी 2024 रोजी दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा होतील . मतिमंद,कर्णबधीर, अस्थिव्यंग व अंध प्रवर्गातील एक हजार खेळाडू सहभागी होणार आहेत व 200 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत या दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये 25 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, व 400 मीटर धावणे व 4×100 रिले,गोळाफेक, लांब उडी,उभे राहून उडी मारणे अंधासाठी बुद्धिबळ, पासिंग द बॉल ,अस्थिव्यंग प्रवर्गासाठी व्हीलचेअर रेस 25 मीटर धावणे, व्हीलचेअर वर बसून गोळा फेक, बादलीत बॉल टाकणे, 25 मीटर चालणे इत्यादी खेळ प्रकार होणार आहेत सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल उगले – तेली उपस्थित राहणार आहेत. दिनांक 06 फेब्रुवारी 2024 रोजी दिव्यांगांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम छत्रपती रंग भवन या ठिकाणी संपन्न होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोकगीत, भक्ती गीत,देशभक्तीपर गीत, व पोवाडा इत्यादी कार्यक्रम सर्व प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थी सादर करणार आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते होणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनीषा रोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन स्मिता पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशादीन शेळकंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी 05 खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या दिव्यांग खेळाडूंना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार गोल्ड मेडल,सिल्वर मेडल आणि कांस्य पदक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. व प्रत्येक प्रवर्गातून चॅम्पियनशिप काढली जाणार आहे सदर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी दिव्यांग खेळाडूंना ट्रॅक सूट ,बूट,सॉक्स, व टोपी दिली जाणार आहे या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खामितकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी केलेआहे.

error: Content is protected !!