ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवशीय व्यावसायिक उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर संपन्न

मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवशीय व्यावसायिक उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर संपन्न

अंबाजोगाई प्रतिनिधी-नोकरीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नोकर भरती संदर्भात शासनाची उदासिनता आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण होत आहे.
शिक्षण घेऊनही जर नोकरी मिळत नसेल तर शिकून उपयोगच काय असे प्रश्न तरुणाईला पडत आहेत.
नेमका हाच धागा पकडून सामाजिक न्याय व सक्षमीकरण कक्ष आणि आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानवलोक समाजकार्य महाविद्यालय यांच्या वतीने स्वयंरोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना ओळखता याव्या व विविध कौशल्याचा वापर करून त्या प्राप्त करता याव्या हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून दोन दिवशीय 7 व 8 फेब्रुवारी रोजी कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यात विद्यार्थ्यांना बातमी तयार करणे.विविध प्रकल्पाचे अहवाल तयार करणे.संस्थेसाठी निधी कसा उभा करावा यासह इतर महत्त्वाच्या बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले.
या शिबिराला लातूर,परभणी,धाराशिव या जिल्ह्यासह विविध महाविद्यालयाचे 98 विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.संदिप महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रशिक्षण शिबिराच्या समन्वयक म्हणून डॉ.रमा पांडे,प्रा.सुकेशीनी जोगदंड यांनी काम पाहिले.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मानवलोक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव हे होते.

error: Content is protected !!