ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

एड्स जनजागृती आजही काळाची गरज- धनराज पवार

एड्स जनजागृती आजही काळाची गरज- धनराज पवार

अंबाजोगाई प्रतिनिधी-येथील वसुंधरा महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मौजे चोथेवाडी या ठिकाणी सुरू आहे. त्यानिमित्त दि.4-2-2024 रोजी संपन्न झालेल्या सकाळच्या सत्रा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रेड रिबन क्लब अंतर्गत एडस जनजागृती या विषया वरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष चोथेवाडी चे उपसरपंच मा. अर्जुन जाधव, विश्वास लवंद,सरपंच महादेव निळे मा पीर साहब,रा.से.यो. जिल्हा समन्वयक, डॉ. अमोल गंगणे कार्यक्रमाधिकारी डॉ मकरंद जोगदंड उपस्थित होते. पुढे बोलताना पवार यांनी आजच्या या 21व्या शतकामध्ये एडस जनजागृती समाजामध्ये मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाजाचे स्वास्थ्य चांगलं राहू शकेल, अशा या समाज उपयोगी कार्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी पुढाकार घेतला पाहिजे,तरच खऱ्या अर्थाने एडस जनजागृतीची मोहीम यशस्वी होईल. यावेळी विश्वास लवंद यांनी एडसग्रस्तांनी वेळीच उपचार घेतले तर त्यांना आनंदात जीवन आयुष्यभर जगता येऊ शकते असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से. यो.जिल्हा समन्वयक डॉ.अमोल गंगणे,सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. मकरंद जोगदंड यांनी केले तर आभार पीर साहब यांनी मानले या कार्यक्रमासाठी गावकरी स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!