ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

अशोक चव्हाण यांच्यासोबत ११ आमदारदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती -सूत्र

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

अशोक चव्हाण यांच्यासोबत ११ आमदारदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती -सूत्र

मुंबई (प्रतिनिधी):-काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत ११ आमदारदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याचं देखील कळतंय. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवल जात आहे.

काँग्रेसचे अशोक चव्हाण धक्का देणार?
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा समोर येत आहेत. अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर या बातम्या समोर आल्या आहेत.

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचं म्हटलं जात होतं. तसेच अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र आता विधानसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.

नार्वेकराच्या भेटीमुळे रंगल्या चर्चा…
साम टीव्हीने अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. सध्या सुरु असेलल्या चर्चांवर अशोक चव्हाण लवकरच खुलासा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, लातूरमध्ये अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी भाजप प्रवेशाचे स्टेटस ठेवल्याच्याही चर्चा समोर आल्या आहेत. अद्याप अशोक चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून अशोक चव्हाण यांच्या प्रतिक्रियेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. या चर्चा खऱ्या ठरल्यास हा महाराष्ट्र काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का असेल.

error: Content is protected !!