ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

लोकसभा निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

लोकसभा निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न

जामखेड प्रतिनिधी;-शनिवार दि २०-४-२०२४ रोजी जामखेड येथे अहमदनगर लोकसभा निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली.अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जामखेडचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा.गणपत(आबा) कराळे

होते. या प्रसंगी मा.ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त समन्वय, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.प्रा.किसन चव्हाण सर
यांची महत्त्वपूर्ण मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी मा.ॲड डॉ.अरुण (आबा) जाधव म्हणाले. की श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार देतील त्याला जामखेड तालुक्यातुन भरघोष मतदान देवुन निवडणूक आणणार हे मात्र निश्चित. साहेब जो उमेदवार देणार त्या उमेदवाराचा गावोगावी जाऊन प्रचार करणार इथला आदिवासी,भटके विमुक्त, गरीब मराठा, ओ.बी.सी मुस्लिम समाजाच्या मतावर उमेदवार निवडून आणणार मा.प्रा.किसन चव्हाण सर आपल्या धारदार भाषणात म्हणाले की अहमदनगर दक्षिण व उत्तर मतदार संघातून भाजपा हद्दपार करण्याचा ठाम निर्णय वंचित समुहाने घेणे गरजेचे आहे. आणि मला खात्री आहे. की अहमदनगर दक्षिणमधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार यावेळी मा.बापूसाहेब ओहोळ प्रवक्ते लोकाधिकार आंदोलन, मा.प्रतीक (दादा) बारसे जिल्हाध्यक्ष दक्षिण वंचित बहुजन आघाडी, मा.भीमराव चव्हाण वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण संघटक, सुरेखाताई सदाफुले भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्ष, मा.उत्तमराव सावंत नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष, मा.वैजनाथ केसकर धनगर समाज नेते, मा.विशाल पवार आदिवासी नेते, मा.संतोष चव्हाण, द्वारकाताई पवार आदिवासी नेत्या, या सर्वांचे मनोगते झाली. या बैठकीस मा.अजहर काजी मुस्लिम नेते, मा.सय्यद मुक्तार जनता टेलर, मा.योगेश सदाफुले.मा.भीमराव सुरवसे वडार समाज नेते, डॉ. मा.खलीलभाई शेख, मा. रंजन (नाना) मेघडंबर, मा.कल्याण आव्हाड ग्रा.पं. सदस्य जवळा, मा.मुकुंद घायतडक मास्टर, सर्जेराव गंगावणे सरपंच बाळगव्हाण, सागर ससाने वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष जामखेड, मा.बाबा कांबळे, मा.हुसेन मदारी, मा.मोहन चव्हाण, मा.मोहन शिंदे, रेश्माताई बागवान, मा.बाळू लोखंडे, मा.संतोष पवार, मा.रवींद्र जाधव, मा.अरविंद जाधव, मा.मच्छिंद्र अण्णा जाधव, मा.प्रकाश सावंत, मा.भारत सावंत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. महीला भगीणींचा सहभाग लक्षणीय होता. या बैठकीचे सूत्रसंचालन जामखेड वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी केले. तर सर्व उपस्थितांचे आभार जामखेड वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!