ब्रेकिंग न्युज
पंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागरमहाराष्ट्र दिनी आळंदीत रक्तदान शिबीर उत्साहात १०५ रक्तदात्यांचा सहभाग ; १५० वर नागरिकांची आरोग्य तपासणीही निवडणूक म्हणजे आपल्या अस्तित्वाची आणि सन्मानाची लढाई- आ.संदीप क्षीरसागरसंत तुकाराम मंदिर तळेगाव येथे निवासी संस्कार शिबिराचे आयोजनलिंबागणेश येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरीपंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी आ.मुंदडा डोअर टू डोअर मतदारांपर्यंतमादळमोही कोळगाव सर्कलमध्ये बजरंग सोनवणे यांच्या दौर्‍यामुळे मतदारांमध्ये उत्साह

माजी उपसरपंच सुधाकर ( आप्पा ) यांचे निधन

किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी तथा माजी उपसरपंच सुधाकर ( आप्पा ) पवार यांना ग्रामस्थांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

(अंमळनेर ) प्रतिनिधी  २०.पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील अंमळनेर गावचे माजी उपसरपंच तथा किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी सुधाकर ( आप्पा ) भानुदास पवार ( ६५ वय ) यांचे अल्पशा आजाराने अंमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरीरात्री दुःखद निधन झाले आहे . शांत मनमिळाव व्यक्तिमत्व असलेले सुधाकर पवार यांना गावातील सर्व लहान मुलापासून थोर व्यक्तीपर्यंत लोक आप्पा या त्यांच्या टोपण नावाने ओळखले जायचे . तसेच आप्पांचे सामाजिक , धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान असायचे . अंमळनेर व अंमळनेर परिसरात आप्पा नावाचे मोठे व्यापारी व्यक्ती महत्त्व होते . सुधाकर आप्पांचा शांत व्यक्तिमत्व म्हणून अंमळनेर परिसरात मोठा बोलबाला असायचा . पूर्वी आप्पांचा तुपाचा व्यवसाय असायचा अंमळनेर प्रसिद्ध तुपाचे व्यापारी म्हणून अहमदनगर येथे त्यांचे नाव झाले होते . अंमळनेर गावचे उपसरपंच म्हणून पाच वर्षे ग्रामपंचायत मध्ये त्यांचा कार्यकाळ राहिला होता . काही वर्षापासून आप्पा हे मधुमेह या आजाराने ग्रस्त होते . तसेच त्यांची सहा महिन्यापासून मधुमेह व बीपी (शुगर ) वाढल्यामुळे तब्येत ढासाळली होती . काला रात्री अचानक १९ एप्रिल रोजी आप्पाचे दुःखद निधन झाले . त्यांच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंमळनेर येथील त्यांच्या शेतात सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले . याप्रसंगी अंमळनेर परिसरातील व्यापारी, ग्रामस्थ , सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार, शेतकरी वर्ग , नातेवाईक , मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, नातेवाईक , असा मोठा परिवार आहे . सर्वांच्या वतीने आप्पांना अखेरचा निरोप देण्यात आला व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

error: Content is protected !!