ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

*बजरंग सोनवणे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार* *जयंत पाटलांसह घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार* ————————————-

 

बीड :- बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे सोमवारी (दि. २२) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.

बीड येथील राष्ट्रवादी भवनात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप भैय्या क्षिरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे, माजी आमदार उषाताई दराडे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार सय्यद सलिम, डीपीआयचे अजिंक्य चांदणे, उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वरेकर, रत्नाकर शिंदे, कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. अजय बुरांडे, शेकापचे भाई मोहन गुंड हे उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, आम्ही सोमवारी (दि. २२) नामनिर्देशन पत्र सादर करणार आहोत. नामनिर्देशन पत्र सादर करताना राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, व सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. मात्र उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहोत. असे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!