ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण

जामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण

तीन मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात चालू आहे

जामखेड तालुका प्रतिनिधी;-चित्रपट दिग्दर्शक अल्ताफ शेख हे लेखन, दिग्दर्शन, गीतकार या पाठोपाठ आता बॉलिवूड चित्रपटात संगीत दिग्दर्शक रूपाने प्रेक्षकांसमोर येत आहेत. अल्ताफ शेख यांनी आगामी हिंदी चित्रपट ‘लोरी’चे गीत लेखन केले असून, सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत संगीत दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, गायिका उर्मिला धनगर, गायक स्वप्निल बांदोडकर, गायिका प्रियांका बर्वे आणि गायिका अंजली गायकवाड यांनी या चित्रपटाची गाणी गायली आहेत.
दिग्दर्शक अल्ताफ शेख यांच्या २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘वेडा बी.एफ.’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आकरा करोड पन्नास लाख पंचेचाळीस हजार सातशे रुपये एवढा गल्ला करून रेकॉर्ड ब्रेक करून टाकले. सिनेमातील ‘हे माझे दुर्वेश बाबा’ या गाण्याची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ‘लोरी’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. ती त्यांनी सुधीर कुमार हजेरी यांच्यासोबत यशस्वीपणे पार पाडली आहे.
अल्ताफ शेख यांनी त्यांच्या अनोख्या लेखन शैलीतून याआधी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यापैकी २०१८ मध्ये रिलीज झालेल्या वेडा बी.एफ या हिंदू – मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार्‍या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला केला होता. वेडा बी.एफ चित्रपटाची नोंद वल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.
दरम्यान, साई राम अ क्रिएटिव्ह वर्ल्डचप्र स्तुती असलेल्या लोरी चित्रपटाचे निर्मिती अविनाश कवठणकर यांची असून, दिग्दर्शन राजू रेवणकर यांचे आहे. डीओपी कुमार डोंगरे, पणती पटेल, राजकुमार, अली शेख, शान कक्कर, रंजीत दास, अभिलाषा घैरा, प्रतिभा शिंपी, आरती शिंदे; तर आर्ट – राजू माळी, मेकअप- केतन, कॉस्ट्यूम- संगीता चौरे आणि आरती पाटील कुलकर्णी, लाईन प्रोड्यूसर- शाहजहां शेख, प्रोडक्शन मैनेजर- अमजदखान शेख, किरण घोडके, अभिषेक चौरे, हर्ष राजे, मेकअप – किरण सिद्दीद्दी यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
आहेत. हिंदी आणि मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटाचा भाग आहेत.

error: Content is protected !!