ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

तब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाही

तब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाही

जामखेड प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा विद्यालयात तब्बल २६ वर्षांनी एकत्र आलेले १२७ विद्यार्थ्यांच्या एकदिवसीय शाळा स्नेह मेळाच्या अध्यक्षतेखाली प्रा गहिनीनाथ काकडे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वर्गमित्र मैत्रीण व माजी शिक्षक यांना श्रद्धांजली वाहत स्नेह मेळावा पार पडला .
यावेळी २६ वर्षांनी एकत्र आलेले मित्र मैत्रिणी एकमेकास कडकडून आलिंगन देत डोळ्यातील अश्रू वाहत आपुलकीने आपल्या सहजीवनसह संसारिक, आरोग्य, सामाजिक विषयावर चर्चा करत या स्नेहमेळ्यात एकत्र आलेल्या मुल आणि मुलींनी आपल्या काही विद्यार्थी मित्र मैत्रिणी अर्ध्यावर सोडून गेलेल्या आठवणीत काढत मित्रांशी भावना अश्रू वाहत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आट्यापाट्याचे खेळ, शाळेचे शिस्तीविषयी माहिती, जुने कडू गोड आठवणी, कविता, गाणे, चुटकले, मनोरंजन पर गीत आधी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात रमत दिवसभर स्नेह मेळावा पूर्ण झाला. या एक दिवशीय शाळेच्या स्नेह मेळाव्यात एकदिवसीय शाळेच्या मेळाव्यात दोस्ती पर मैत्रीचे, देशभक्तीपर गीत, सामाजिक संदेश देत जुन्या गढी हायस्कूल वर एकत्रित येत डीजे गाण्याचा तालावर थीरकताना दिसून आले. तसेच आपल्या वर्गातील जुन्या मित्र मैत्रिणींचे प्रेम व आपल्या गावाविषयी असलेले आपुलकी जपत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी मैत्रिणींना माहेरची साडी देत सर्व मुलींना माहेरची साडी आठवण म्हणून भेट दिली. एकमेकांना विविध आठवणींचे उजाळे देत विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत हा स्नेह मेळावा स्नेहभोजन करून स्नेहभोजनाचा आस्वाद घेत राष्ट्रगीतांनी समारोप करत हा आनंदी स्नेह मेळावा आपली नाती आपली माणसं जपत एकदिवसीय शाळेचा स्नेह मेळाव्यात शाळेचे (माजी) जुने शिक्षक रामकृष्ण मुरूमकर ,देविदास घनवट , ग्यानबा शिंदे , तुकाराम भराटे, महादेव गडदे , रामचंद्र गुरसाळी , दत्तात्रय बिरंगळ,गोरख राजगुरू, अशोक भांडवलकर, तुकाराम विधाते,यांच्यासह शिवाजी भोसले, साजिद शेख, अमित बाबळे, देविदास घुगे, अमोल थोरात, महेश गाडीलोहार ,गुरुराज पवार, जाहीर शेख, महेश रणभोर ,संदीप वडे ,किरण गोलेकर, महादेव धोत्रे ,शत्रुघ्न बारगजे, अमित पांडकर, दादा मोरे ,संजय सुर्वे, अमित शहा, सुशीलकुमार शिंदे, प्रवीण बडगुजर, कन्हैया भैसडे ,वैशाली थोरात, भीवरा लटके, सारिका हिंगे, अरुणा विभुते, नीता जोरे, सुजाता ऊजागरे, बेगम पंजाबी, कांचन दळवी, मंगल वाडीले, अर्चना मुरूमकर ,ललिता गोसावी, सरिता खरात, वैशाली गुरसाळी, सुनीता कुंभार यांच्यासह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित बाभळे व साजिद शेख,सूत्रसंचालन संतोष सरसमकर, शिवाजी भोसले, सारिका हिंगे, भीवरा लटके आभार वैशाली थोरात अमोल थोरात यांनी व्यक्त केले
यावेळी झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात उखाण्या घेण्याच्या स्पर्धेमध्ये वैशाली थोरात यांनी घेतलेला उखाणा खूपच उल्लेखनीय होऊन सर्व स्नेहसंमेलनात आकर्षणाचा विषय ठरला त्यांनी घेतलेला उखाणा “केळीचे पान करा करा कापते सासूबाईचे कार्टे टकमक बघतेयं” हाच विषय मोठ्या चर्चेला गेला

error: Content is protected !!